अंजीर खाण्याचे हे फायदे वाचून तुम्ही आजच अंजीर खाणे सुरु कराल.

अंजीर एक स्वादिष्ट आणि बहुगुणी फळ आहे. याची पिकलेली फळे आणि सुक्या मेव्याच्या रूपातही लोक हे फळ खातात. यातल्या सुख्या अंजिरात साखरेची मात्रा ६२ टक्के तर ओल्या अंजिरात 22 टक्के एवढी असते. याच्यात कैल्सियम तसेच विटामिन ‘ए’आणि ‘बी’ भरपूर प्रमाणात असते. याने बद्धकोष्ठ दूर होते. मन प्रसन्न राहाते आणि अशक्तपणा दूर होतो. सर्दी खोकल्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे.

खा अंजीर हळद आणि मध मिसळून आणि करा मोठ्या मोठ्या आजारांना दूर

अंजिरात कार्बोहाइड्रेट ६३ टक्के, प्रोटीन ५.५ टक्के, सेल्यूलोज ७.३ टक्के , आणि पाणी २०.८ टक्के असते.याच्याशिवाय प्रत्येक १०० ग्राम अंजिरात भरपूर प्रमाणात आयर्न, विटामिन असते, चला आता पाहूया अंजीर खाल्ल्याने काय काय फायदे होतात ते. आपण हे पाहू कि कोणत्या कोणत्या आजारांत अंजीर खाण्याचे कसे कसे फायदे होतात ते.

१. एनिमिया

अंजिरात आयरन आणि कैल्शियम भरपूर प्रमाणात आढळतात आणि याचा अनिमिया मध्ये खूप फायदा होतो. १० मनुके आणि ८ अंजीर १०० मिली दुधात उकळवून प्या. यामुळे रक्तात वाढ तर होतेच आणि रक्तासंबंधी विकारही दूर होतात.

२. बद्धकोष्ठ

३ ते चार पिकलेले अंजीर दुधात उकळवून रात्री झोपण्याआधी खावेत. त्यानंतर तेच राहिलेले दुध पिऊन टाका. याने बद्धकोष्ठता दूर होईल.चार अंजीर रात्री झोपताना पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी थोडे वाटून घ्या आणि ते पाणी प्या. ते पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठ दूर होईल.

३. अस्थमा-

ज्यांना दम्याचा त्रास होत असेल त्यांनी अंजीर खाल्ला तर खूप फायदा होतो. अंजिराची पाने खाल्ल्याने खूप फायदा होतो. जे लोक इंसुलिन घेतात त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचे आहे. यात पोटैशियमची मात्रा भरपूर आहे आणि ज्यामुळे ब्‍लड शुगरची पातळी नियंत्रणात राहाते.

४. खोकला

खोकल्यासाठी अंजीर फार लाभदायक आहे. पाण्यात पाच अंजीर घालून उकळा. हे पाणी गळून गरम गरम पाण्यात सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने सर्दीमध्ये ही फायदा होतो.

५. शक्ती वाढते

अंजीर खाल्ल्याने शक्ती वाढते. ज्यांना अशक्तपणा येत असेल त्यांनी नक्की अंजिराचे सेवन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *