परफेक्ट फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला लागला सहा वर्षाहून अधिक काळ आणि 7 लाखांहून अधिक क्लिक.

असे म्हणतात कि एखादी व्यक्तीने जर कोणतेही काम करण्याचे ठरवूनच घेतले आणि तितके प्रयत्न केले तर त्याला कधी ना कधी त्या कामात यश मिळतेच. याच म्हणीला सार्थ केले आहे फोटोग्राफर एलन मैकफैदयन ने. त्यांनी साधारण सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि साधारण ७२०००० फोटो काढल्यानंतर किंगफिशर पक्ष्याचा एक विलक्षण सुंदर फोटो कैम्र्यात कैद केला आहे ज्यावर विश्वास बसणार नाही. त्यांनी हा फोटो त्यांच्या आजोबांना समर्पित केला आहे.

साधारण ४० वर्षे आधी एलन मैफेदयन जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे आजोबा रॉबर्ट मुरे त्यांना किंगफिशरचे घरटे दाखवायला झर्याच्या किनारी घेऊन गेले होते. मोठे झाल्यानंतरही ते ही घटना विसरले नव्हते. म्हणून साधारण सहा वर्ष आधी त्यांनी तिकडचे छायाचित्रण करण्याचे नक्की केले आणि त्यांनी हे ठरवले कि ते त्याच्या वेगवेगळ्या छटा बंदिस्त करतील. यासाठी ते रोज शेकडो फोटो काढत असत जेणेकरून पक्ष्याची सुंदर मुद्रा कैद होऊ शकेल जेव्हा तो पूर्ण मनापासून पाण्यात गळ टाकून शिकार करतो.

त्यासाठी दरवर्षी जेव्हा ज्वारीचे पाणी किंगफिशरच्या घरट्यात भरले जायचे तेव्हा एलन एका भोकात माती व पाणी मिसळून या पक्ष्यासाठी घरटे तयार करत असत. या सहा वर्षात एलन अनेक वेळा तिकडे जाऊन किंगफिशरचा पाण्यात गळ टाकलेल्या मुद्रेचा फोटो काढत असत. अशात शेव्तो एक दिवस त्यांना अचूक छायाचित्र काढण्यात यश आले ज्यासाठी इतकी प्रतीक्षा त्यांनी केली होती.

 

एलन ने यासाठी साधारण ४२०० तास घालवले आणि साधारण ७२०००० फोटो काढले तेव्हा कुठे त्यांना अचूक फोटो मिळू शकला ज्यात पक्ष्याने पाण्यात गळ टाकला आहे व जराही पाणी उडत नाही. त्यांनी असेही सांगितले कि या जगात असे लोक विरळाच असतील ज्यांनी असा क्षण बंदिस्त केला असेल कारण किंगफिशर पाण्यात बंदुकीच्या गोळीप्रमाणे बर्याच वेगाने उडी मारतो.

असा फोटो यायला खूप धैर्य आणि नशिबाची साथ असावी लागते. त्यांच्या आजोबांचे निधन १९९४ मध्ये ७८ व्या वर्षी झाले होते आणि त्यांना हे दुख्ख आहे कि ते हा क्षण पाहू शकले नाहीत. आणि ह्याच कारणासाठी त्यांनी हा फोटो काढायला इतके कष्ट घेतले व हा अचूक फोटो आपल्या आजोबांना समर्पित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *