आता नाही होणार बलात्कार , या मुलीने शोधून काढले आहे असे यंत्र ज्याने बलात्कार करणाऱ्यांचा थरकाप उडेल

आजच्या काळात बहुतांश महिला स्वतंत्र होऊन कार्यालय किंवा अन्य ठिकाणी काम करतात. आताच्या आधुनिक युगात स्त्रियाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले करियर संपूर्ण मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने घडवते आणि पुढेही जात आहेत, प्रगती करत आहेत. याशिवाय त्यांना अनेक मानसिक शारीरक त्रासांना सामोरे जावे लागते. कधी लैंगिक अत्त्याचार तर कधी बलात्काराच्या बळी पडतात स्त्रिया. आज आम्ही तुम्हाला याच विषयावर काही सांगणार आहोत. या संवेदनशील विषयात काही महत्वाचे तुम्हाला सांगणार आहोत.

बरेचदा असे होते कि सार्वजनिक ठिकाणी महाविद्यालयात वगैरे स्त्रियांना काही लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. अशा वेळी स्त्रियांचा कोंडमारा होतो व त्यांचे आयुष्य उद्वस्त होते, त्यांना वावरताना खूप असुरक्षित वाटते. यासाठी हे यंत्रत् निर्माण केले गेले आहे जेणेकरून स्त्रियांना सुरक्षित वाटू शकेल व त्या मोकळे जगू शकतील.

उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यात राहाणारी सीणु कुमरी ने एक असे  यंत्र बनवले आहे जे बलात्कार रोकन्याबरोबरच बलात्कार पकडण्यात पण मदत करेल. चला पाहूया काय आहे हे अनोखे तंत्र. सीणु कुमारीचे असे म्हणणे आहे कि तिच्या या शोधामुळे बलात्कारासारख्या घटनांना रोकण्यात खूपच मदत होईल. या यंत्रात कैमरा, जीपीएस सारखे पैलू समाविष्ट आहेत ज्याच्यामार्फात स्त्रिया सुरक्षित राहू शकतात. तिने शोधलेले हे ” रेप प्रूफ डिवाइस ” अंडरवियरमध्ये लावले जाईल, ज्यात लावलेल्या कॅमेराच्या माध्यमातून बलात्कार करणार्याचा चेहरा पूर्णपणे टिपला जाऊ शकेल आणि यात असलेल्या बटणाच्या एका क्लिकच्या मदतीने मदतीसाठी फोन केला जाऊ शकतो व तत्काळ मदत मिळवता येऊ शकते.

याच्या शिवाय यात असलेल्या जीपीएसच्या मदतीने कुटुंब आणि पोलिसांना ही धोक्याची सूचना दिली जाऊ शकते. एवढेच नाही तर या यंत्रात एक कुलूपही लावले गेले आहे जे पासवर्ड शिवाय उघडू शकणार नाही.

आजकालच्या जमान्यात सगळ्यात महत्वाची आहे ती स्त्रियांची सुरक्षितता आणि त्यासाठी हे अनोखे तंत्र आहे . ह्या तंत्राचा वापर नक्कीच स्त्रियांसाठी फायद्याचा असू शकतो.हे तंत्र वापरा आणि सुरक्षित व्हा. याची माहिती इतर महिलांनाही ही द्या जेणेकरून सगळ्याचजणी सुरक्षित आणि मोकळे आयुष्य जगू शकतील. तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. आवडला असल्यास तुमच्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवा. तुमच्या ओळखीतल्या महिलांना नक्कीच हा लेख दाखवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *