आत्ताच, अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर, मुंबईहून जोधपूरला रवाना झाली डॉक्टरांची संपूर्ण टीम !

नवी दिल्ली : अमिताभ बच्चन भारतातच नव्हे तर देशभरात सगळ्यांचा लाडका अभिनेता आहे.इतके वय झाल्यानंतरही अमिताभ यांनी काम करणे सोडलेले नाही.आजही अमिताभ यांनी स्वतःला आपल्या कामाला वाहून घेतलेले आहे आणि म्हणूनच त्यांना या युगाचे महानायक म्हणून संबोधले जाते.त्यांचा १०२ नॉट आउट चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय आणि ते आता आमीर खानबरोबर ठग ऑफ हिंदुस्तान मध्ये दिसणार आहेत.या वयातही ते जोमाने काम करताना दिसतात.याच दरम्यान एक बातमी अशी समोर आली आहे कि जोधपूरमध्ये ठग ऑफ हिंदुस्तानच्या चित्रिकरणादरम्यान त्यांची तब्बेत बिघडली.

रिपोर्टप्रमाणे अमिताभ हे ठग ऑफ हिंदुस्तानच्या चित्रिकरणासाठी जोधपूरला पोहोचले होते आणि तिकडे त्यांची तब्बेत बिघडली. अहवालानुसार मुंबईहून तज्ञ डॉक्टरांची एक टीम चार्टर्ड विमानाने जोधपूरला पाठवण्यात आली आहे.त्यांची प्रकृती नक्की किती गंभीर आहे हे अजून नक्की समजलेले नाही.तपासणी करून डॉक्टर हे सांगू शकतील कि त्यांना इलाजासाठी मुंबईला आणावे लागेल कि नाही.माहितीनुसार काल रात्रभर त्यांनी चित्रीकरण केले आणि सकाळी त्यांची प्रकृती खालावली.त्यांनी स्वतःच ही माहिती सूत्रांना दिली.बिग बी नी त्यांची प्रकृती खराब असल्याची माहिती त्यांच्या ब्लॉगवरून वाचकांना दिली.सकाळी पाच वाजता त्यांनी ही माहिती दिली कि त्यांची प्रकृती खूप खराब आहे आणि मुंबईहून डॉक्टरांची टीम जोधपूरला रवाना झाली आहे. ही बातमी वाचून त्यांचे अनेक चाहते खूप चिंतेत आहेत व त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच बिघडली होती अमिताभ यांची प्रकृती

काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांची प्रकृती थोडी बिघडली होती. तेव्हा त्याच वेळी त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले व उपचार केले गेले.गेल्या अनेक दिवसात त्यांना इलाज करण्याचे अनेक प्रसंग घडले.सध्या अमिताभ हे त्यांचा आगामी चित्रपट नॉट आउट चे चित्रीकरण करत आहेत.या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालेला आहे.

अमिताभ यांच्याबरोबर या चित्रपटात ऋषी कपूरही आहेत.हे दोघे कलाकार २७ वर्षांनतर चित्रपटात एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट एका गुजराती नाटकावर आधारित आहे ज्यात या दोन्ही कलाकारांनी बुजुर्गांची भूमिका वठवली आहे. याचबरोबर ते अमीर खानबरोबर ठग ऑफ हिंदुस्तानचेही चित्रीकरण करत आहेत.याच चित्रीकरणादरम्यान त्यांची तब्बेत बिघडली असे सूत्रांकडून समजते.

तब्बेत बिघडल्यानंतर अमिताभ यांनी “मेहनतीशिवाय कोणालाही काहीही मिळत नाही ” असे ट्वीट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *