आपल्या बाळांचे फोटो फेसबुकवर शेयर करताय ? थांबा !! आधी हे वाचा .

आपल्या लहान बाळांचे सगळ्यांनाच कौतुक असते आणि लहान बाळाचा जन्म झाला कि प्रत्येकाला घाई असते ती फोटो फेसबुकवर टाकायची. अगदी गरोदरपणातही बेबी शाॅवर(डोहाळ जेवण)चे फोटो मोठ्या उत्साहात फेसबुकवर टाकले जातात. फक्त फोटोच टाकले जात नाहीत तर त्यावर #waiting #excited सारखे निरनिराळे हॅशटॅगही वापरले जातात. जर तुम्हीही असे हॅशटॅग वापरून फोटो फेसबुकवर टाकत असाल तर थांबा !!

चाइल्ड रेस्क्यू कोअॅलिश संस्था यांची मोहीम

ही संस्था लहान मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देते. या संस्थेकडून लहान मुलांचे फोटो फेसबुकवर शेयर करू नये या साठी लोकजागर केला जात आहे. त्यासाठी एक विशेष मोहीमही त्यांनी हातात घेतली आहे.

मुलांचे फोटोफेसबुकवर टाकताना आपण जे हॅशटॅग वापरतो ते धोकादायक ठरू शकतात. या हॅशटॅगच्या माध्यमातून मुलांचे फोटो शोधून त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. म्हणूनच अतिउत्साहात आपल्या मुलांचे फोटो फेसबुकवर टाकू नका.

कोणते आहेत ते हॅशटॅग

#BathTime, #mybaby, #myworld, # mylifeline

#NakedKids, #newborn #sleepybaby

#ToiletTraining, #babycutie #born #swin

हॅशटॅगमुळे भविष्य येऊ शकते अंधारात

मुले लहान असल्याने त्यांचे कोणत्याही अवस्थेतले फोटो आपण हॅशटॅगच्या अंतर्गत शेयर करतो. हे गोंडस फोटो मग वायरल होतात. हे फोटो वापरून फसवणूक केली जाऊ शकते. जर बाळाचे नग्न फोटो कौतुकाने टाकले असतील तर त्याचा नक्कीच गैरवापर होऊ शकतो. आणि यामुळे प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते.

स्वतंत्र फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज- फक्त लहान बाळांसाठी

कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी आपण सगळ्यात आधी गुगलचा आधार घेतो. अशी काही स्वतंत्र पेजेस सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहेत कि जी प्रत्येक गोष्टीसाठी खास तयार केली गेली आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्वतंत्र पेजला अधिकृत पेज म्हणून दर्जा दिला गेला आहे. इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर अशी अनेक पेजेस तुम्ही पाहू शकता जी सगळे लोक आवडीने पाहतात.

इंस्टाग्राम- JUST BABY, CUTIES, BABYLYF, _BABYVIDEOS, BABYDREAM या इंस्टाग्रामवरील सगळ्यात जास्त वेळा पहिल्या गेलेल्या आणि सगळ्यात जास्त फोलोवर्स असलेल्यांपैकी काही पेज आहेत.

फेसबुक- BABY-DOLL, BABY-VIDEOS, POOR-BABY, BABY-BATH, BABY-PHOTOGRAPHY…या इंस्टाग्रामवरील सगळ्यात जास्त वेळा पहिल्या गेलेल्या आणि सगळ्यात जास्त फोलोवर्स असलेल्यांपैकी काही पेज आहेत.

तर मग जर तुम्ही बाळांचे फोटो शेयर करत असाल तर सावध व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *