एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत होता पुलाखालून, जाऊन ज्यांनी पहिले त्यांना रडू कोसळले

ही घटना ओडीसाच्या मयूरभंज जिल्ह्यातील आहे ज्या घटनेने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. नवीन पटनायकच्या राज्यात हॉस्पिटलची सुविधा न मिळालेली एक महिला एका पुलाखाली आडोश्यात एका मुलाला जन्म देत होती आणि जे लोक तिकडे मदतीला गेले ते मोठ्याच धर्मसंकटात सापडले कारण तिला मदत करायची ती तरी कशी ?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने आपल्या आयुष्याच्या संपूर्ण कमाईतून पैसे वाचवून तिने एक घर बनवले होते आणि सहा महिन्यापूर्वी एका जंगली हत्तीने तिचे घर तोडून टाकले, तिने तिचे कुटुंब कसे बसे वाचवले आणि गर्भवती असूनही स्वतःचा आणि पोटातल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी ती धावत राहिली.आयुष्याची कमाई उध्वस्त झाल्यावर तिला खायलाही काही नव्हते आणि घरही. ही घटना स्थानिक जिल्हा अधिकार्यांना माहिती आहे.

ही महिला तिच्या कुटुंबाला घेऊन दिवाभर जेवण शोधत राहिली. पण नउ महिने संपल्यावर प्रसववेदना अचानक सुरु झाल्यावर ती लपून कशीतरी समोर असलेल्या पुलाच्या मागे आडोशाला निघून गेली आणि कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय बाळाला जन्म देऊ लागली. त्या दरम्यान तिला असह्य वेदना होत होत्या ज्यामुळे ती खूप जोरात ओरडत होती. शेवटी तिच्या बाळाचा जन्म त्या पुलाखाली झाला. या महिलेने सहा महिन्यात एकदाही कोणत्याही प्रकारच्या स्थानिक सरकारच्या पुनार्वासाचा प्रयत्न केला नाही. आणि तला कोणत्याही प्रकारे सरकारी सहाय्य मिळाले नाही.

ही गोष्ट जेव्हा मिडियासमोर आली तेव्हा तिकडच्या अतिरिक्त जिला अधिकार्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी एवढेच सांगितले कि या गोष्टीची तपासणी केली जात आहे आणि दोषीला नक्कीच शिक्षा मिळेल.एकाच पार्टीला किंवा व्यक्तीला लक्ष्य करण्याच्या भानगडीत समाजाची काही दुख्खे संचार माध्यम सोडून देतात जे खरेतर खूप हृदयद्रावक असतात.हा प्रश्न नवीन पटनायक यांनाही आहे कि त्यांच्या राज्यात महिलांच्या अशा वाईट दशेला कोण जबाबदार आहे . सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि अनेक साधारण बाबतीत लगेच सज्ञान घेणारा हाच महिला आयोग आतापर्यंत या बाबतीत एकही शब्द बोलू इच्छित नाही आणि या पिडीत महिलेसाठी कोणीही धरणे धरले नाही किंवा हरताळ केला नाही. जर हीच परिस्थिती स्त्रियांची राहिली तर भविष्यात इतर महिलांच्या बाबतीत काय होणार ? एकंदरीतच बायकांचे इथून पुढे भविष्य काय हा मोठाच प्रश्न उभा राहिला आहे.

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *