हिंदू धर्मात भगव्या रंगाला इतके महत्व का दिले जाते ? जाणून घ्या त्यामागचे खास कारण

गेरू आणि भगवा रंग एकच आहेत पण भगवा आणि केशरी या रंगांत थोडा फरक आहे. केशरी रंगाला इंग्रजीत Saffron तर भगव्याला Ochre म्हणतात. केशरी रंगात थोडी लाली जास्त असते आणि भगव्यात थोडा पिवळेपणा. हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे आपले असे महत्व आहे. हिंदू ध्वज हा भगवा आणि केशरी दोन्ही रंगांत असतो. नारिंगी रंगपण असाच असतो. रंगांशी निगडीत मनोविज्ञान आणि त्याचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव जाणून घेऊनच हिंदू धर्माच्या काही विशेष रंगांना विशेष कार्यांत समाविष्ट केले गेले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा रंगांच्या बाबतीत जे तुम्ही आधी कुठेच ऐकले किंवा वाचले नसेल.

भगव्या रंगाचे महत्व जाणून घ्यायच्या आधी हे माहिती करून घेणे जरुरीचे आहे कि निसर्गात मुळात किती रंग आहेत आणि त्यांचे महत्व काय आहे? कदाचित हे ऐकून तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल कि वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार काही पशु किंवा पक्ष्यांना पांढरा आणि काळा या रंगांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही रंग दिसत नाही याचाच अर्थ त्यांचे जीवन कृष्णधवल आहे. आपण मनुष्यप्राणी खूप नशीबवान आहोत कि आपण निरनिराळे सुंदर रंग पाहू शकतो.

मूळ रंग : वैज्ञानिकांच्या शोधानुसार रंग मुळात फक्त पाचच असतात, काळा, पांढरा, लाल, निळा आणि पिवळा. काळा आणि पांढऱ्या रंगाला मानणे ही आपली सक्ती किंवा मजबुरी आहे खरेतर हे स्वतंत्र रंग नाहीत. असे पहिले तर मग फक्त तीनच रंग राहतात, लाल पिवळा आणि निळा.

एखादा रंग जेव्हा खूपच विरळ होतो तेव्हा तो पांढरा होतो किंवा दिसतो. जेव्हा एखादा रंग खूपच गडद होतो तेव्हा तो काळा पडतो. लाल रंगात जर पिवळा रंग मिसळला तर तो केशरी होतो. निळ्या रंगात जर पिवळा रंग मिसळला तेव्हा तो हिरवा होतो. अशाच प्रकारे निळा आणि लाल रंग मिळून जांभळा रंग तयार होतो. पुढे जाऊन याच मुख्य रंगांनी हजार रंगांची उत्पत्ती झाली.

भगवा रंग त्याग, बलिदान ,ज्ञान, शुध्दता तसेच सेवेचा प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राम, कृष्ण आणि अर्जुन या सर्वांच्या झेंड्याचा रंग भगवाच होता. भगवा रंग सूर्योदय तसेच सूर्यास्तचा देखील आहे. म्हणूनच भगवा रंग हिंदूंच्या चिरंतन , सनातनी, पुनर्जन्मच्या धारणांना सांगणारा हा रंग आहे.

मूळ रंगांचे रहस्य : तुम्ही आग लागताना पहिली असेल त्यात हे तीन रंग दिसतात. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल कि हे तीन रंगही जन्म मृत्युप्रमाणेच आहेत, जसे आपण ब्रह्मा विष्णू महेश यांच्या बाबतीत म्हणतो. शास्त्रांप्रमाणे आपल्या शरीरात सात प्रकारची चक्रे आहेत. ही सात चक्रे आपल्या सात प्रकारच्या शरीराशी जोडली गेली आहेत ज्यातली मुख्य आहेत तीन, भौतिक, सूक्ष्म आणि कारण. भौतिक शरीर लाल रक्ताने पूर्ण आहे , सूक्ष्म शरीर सूर्याच्या पिवळ्या प्रकाशासारखे आहे आणि कारण शरीर निळा रंग धारण करून आहे.

या तीन रंगांमधील लाल आणि पिवळ्या रंगाची हिंदू धर्मात का निवड केली आहे याचेही कारण आहे.

लाल रंग: हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी नेसतात, हा रंग उत्साह आणि नवजीवनाचे प्रतिक आहे. निसर्गात लाल रंगाची फुले जास्त दिसतात. या व्यतिरिक्त विवाहात नवरामुलगा लाल पगडी घालतो जे येणाऱ्या आयुष्याच्या खुशालीशी निगडीत आहे.

पिवळा रंग – हळदीचा रंग पिवळा असतो जी प्रत्येक मंगलकार्यात वापरली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *