या कारणामुळेच झाले होते ऐश्वर्या सलमान चे ब्रेकअप ? पहा नक्की काय घडले ‘त्या’ रात्री…

बॉलीवूड मध्ये अनेक कलाकार अभिनेते आहेत. काही कलाकार असे आहेत ज्यांची किर्प लोकप्रियता पूर्वी इतकीच टिकून आहे जसे कि आमीर खान किंवा सलमान खान. खान कुटुंबातील सलमान हा असा अभिनेता आहे जो त्यांच्या उत्तम अभिनयाने सगळ्याच चाहत्यांच्या कायमच चर्चेत राहिला आहे. मिडिया व सलमानचे नाते खूप दृढ आहे. सलमान आणि ऐश्वर्या राय हिची प्रेमकहाणी तर तुम्हाल सगळ्यांना माहिती आहेच. एकेकाळी ही प्रेमकहाणी सगळीकडेच खूप गाजली होती. पण दुर्दैवाने या कहाणीचा सुखांत होऊ शकला नाही. सलमान आणि ऐश्वर्या यांचे ब्रेकअप झाले व त्यानंतर ऐश्वर्याचे लग्न अभिषेक बच्चन बरोबर झाले.

सलमानने आजही लग्न केलेले नाही आणि योग्य जोडीदाराचा शोध तो घेत आहे. ही गोष्ट आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. पण ऐश्वर्या आणि सलमानचे ब्रेक अप नक्की कोणत्या कारणावरून झाले असेल याची माहिती अजून कोणालाच मिळालेली नाही. आज आम्ही तुम्हाला हे रहस्य सांगणार आहोत. हम दिल दे चुके सनम चित्रपटापासून या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली. मैत्रीचे रुपांतर हळू हळू प्रेमात झाले परंतु या कहाणीला त्यांनी जगापासून लपवून ठेवले होते. पण झाले असे कि त्या दोघांच्या चुंबनाचा एक फोटो खूपच वायरल झाला आणि हे प्रकरण उघडकीस आले. हौल ऑफ फेम हे पुस्तक ऐश्वर्याच्या जीवनावर लिहिले गेले आहे. ह्यात असे म्हटले गेले आहे कि २००० साली आलेल्या जोश नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी आधी सलमानला मिळाली होती अन जेव्हा त्याला समजले कि यात त्याला ऐश्वर्याच्या भावाची भूमिका करायची आहे त्या क्षणी त्याने हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि त्यानंतर ही भूमिका शाहरुख खानला मिळाली. चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याने स्पष्ट सांगितले कि मला ऐश्वर्याचा भाऊ तरी बनवू नका.

त्यांचे सुत जमले. या नात्याला सलमानच्या घरच्यांची संमती होती पण ऐश्वर्याच्या घरचे याच्या विरोधात होते. तिच्या आईवडिलांनी तिला सलमान बरोबरचे नाते तोडायला सांगितले. त्यानंतर तिने घर सोडले व ती अंधेरीला लोखंडवाला संकुलात राहायला गेली.त्यानंतर दोघांमध्ये काही वाद झाला व त्यांचे नाते तुटले.एक दिवस रात्री सलमान तिच्या घरी पोहोचला आणि तिच्या आईवडिलांबद्दल तो असे काही वाईट शब्द बोलला ज्यामुळे रागावून जाऊन ऐश्वर्याने हे नाते संपवण्यासचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *