कार्यक्रम ‘सावधान इंडिया’ मुळे ८०० कुटुंबे आली रस्त्यावर, कार्यक्रम बंद होण्याचे कारण ऐकून व्हाल थक्क

चित्र जगतात कोणता ना कोणता कार्यक्रम सतत गाजत असतो, चर्चेत राहतो. फार कमी कार्यक्रम असे असतात जे यशस्वी होतात. याच कार्यक्रमांतील एक नाव म्हणजे सावधान इंडिया. स्टारची वाहिनी लाईफ ओके वर येणारा हा कार्यक्रम एकेकाळी सगळ्यांनाच आवडत होता. या कार्यक्रमात समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचे नाट्यमय सादरीकरण केले जायचे जेणेकरून लोक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांपासून सावध होऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील. पण भरपूर टीआरपी मिळवणाऱ्या ह्या कार्यक्रमाला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ताबडतोब बंद केले गेले. याचे नक्की कारण कार्यक्रमाच्या कलाकारांनाही कळू शकले नाही.

सोनी टीवीच्या सीआयडी नंतर सावधान इंडिया हा असा एकमेव कार्यक्रम होता जो गेल्या अनेक वर्षांपासून सगळेच खूप आवडीने पाहात आले होते. अभिनेता सुशांत सिंह या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे पण असे असूनही त्यांनाही हा कार्यक्रम बंद झाल्याचे नक्की कारण कळू शकलेले नाही. हातात आलेल्या बातमीनुसार स्टार भारत या वाहिनीने कार्यक्रमच्या निर्मात्यांना हा कार्यक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. ह्यानंतर कार्यक्रमाचे सगळेच कलाकार हैराण होते कि शेवटी असे काय कारण झाले कि ज्याने हा इतका चांगला कार्यक्रम तत्काळ बंद करण्यात यावा ?

लाईफ ओके नंतर झाला स्टार भारत

खरेतर स्टार भारत चे आधीचे नाव लाईफ ओके असे होते. पण मागच्या वर्षात स्टार नेटवर्क ने या वाहिनीचे नाव बदलून स्टार भारत असे ठेवले. या नामकरणानंतर कार्यक्रमाच्या सादरीकरणाची स्वतंत्र धोरणे ठेवली. सूत्रे असेही सांगतात कि स्टार भारतला सावधान इंडिया या कार्यक्रमासंदर्भात बर्याच काळापासून सादरीकरण संदर्भात अनेक तक्रारी येत होत्या.

जिकडे सावधान इंडिया चे असे म्हणणे होते कि ते ह्या कार्यक्रमात सत्य घटना लोकांसमोर घेऊन येतात तेच दुसरीकडे सामान्य लोकांच्या मते या दाखवलेल्या सगळ्या घटना ह्या सत्य नसून संपूर्णपणे काल्पनिक होत्या ज्याचा खर्या आयुष्याशी काहीही संबंध नाही.लोकांचे असे म्हणणे आहे कि या कार्यक्रमात जास्तकरून खोट्या घटना दाखवल्या जातात ज्या कधीच घडल्या नव्हत्या. याच कारणाने हा कार्यक्रम तत्काळ बंद करण्यात आला.हा कार्यक्रम आतापर्यंत सगळ्यात प्रसिद्ध होता ज्यात सूत्रसंचालन करण्यासाठी मोठमोठ्या कलाकारांना बोलावले जात होते.

हा कार्यक्रम अचानक बंद पडल्याने कलाकारांचे मोठे नुकसान झाIले आहे.तसेच काही कलाकारांना धमक्यांचे संदेशही येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *