का असते स्त्रीचे तिसावे वर्ष सगळ्यात छान ,घ्या जाणून

या जगात देवाने माणसाला दोन रूपांत पाठवले आहे, स्त्री आणि पुरुष. परमेश्वराने बनवलेले हे दोन्ही चेहरे खूपच सुंदर आहेत पण जास्तकरून स्त्रियांच्या सौंदर्याला जास्त महत्व दिले जाते. असे म्हणतात की स्त्रियांना आणि मुलींना समजून घेणे सगळ्यात कठीण आहे. कारण स्त्रिया वरकरणी जेवढ्या स्वतःला बीर दाखवतात तेवढ्याच त्या आतून मृदू व निरागस असतात. याशिवाय आम्ही तुम्हाला हे सांगू की १८-२० वर्षे हे त्यांचे सगळ्यात नाजूक वय असते.एका संशोधनानुसार २० वर्षाच्या मुली वयाच्या सगळ्यात सुंदर टप्प्यातून जात असतात.या वयात त्यांचे सौंदर्य खूपच खुलते.प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या वयाची २० ते ३० वर्षे हा काळ फारच महत्वाचा असतो. याचे कारण २० वर्षांपर्यंत स्त्रिया त्यांच्या नाजूक वयात असतात आणि त्यांच्यात समजूतदारपणाचा अभाव असतो. पण तिसाव्या वर्षापर्यंत पोहोचताना त्या बर्याच समंजस होतात आणि सगळ्यांची काळजी घेणे त्यांना नीट जमते.

असे म्हटले तरी चालेल की प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या वयाचे तिसावे वर्ष खूप खास असते. म्हणूनच ३०व्या वर्षाबद्द्दलचे हे सत्य तुम्हाला चकित करून सोडेल पण हेच सत्य आहे. या मागचे कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल. आज या लेखात आम्ही तुम्हाला याच कारणाबाबत सांगणार आहोत की ज्यामुळे प्रत्येक मुलीचे तिसावे वर्ष तिच्या आयुष्यातले सगळ्यात खास वर्ष असते.

तीस वर्षापेक्षा कमी वयात प्रत्येकच माणसातील बालीशपणा जाणवतोच. अशात स्त्रिया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो नीट समजून घेऊ शकत नाहीत. पण वयाच्या तिसाव्या टप्प्याकडे पोहोचेपर्यंत स्त्रियांमध्ये विचार आणि समजूतदारपणाची शक्ती पुरती वाढलेली असते. या वयात स्त्रिया योग्य तिकडे तडजोड करणे शिकतात. या वयात स्त्रियांमध्ये आत्मविश्वासाची झलक त्यांच्या चेहर्याला आणि व्यक्तीमत्वाला आकर्षक बनवतात आणि त्याचबरोबर त्यांच्यातला संकोचही दूर होतो.

या वयापर्यंत पोहोचता पोहोचता स्त्रियांचा बालीशपणाचे रुपांतर परिपक्वतेमध्ये होते.त्यामुळे त्या प्रत्येक लहान सहान गोष्टींत भांडणे सोडून देतात आणि आपल्या चूका व उणीवा ओळखून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. तीस वर्षे वयापेक्षा कमी वयात नेहमी स्त्रिया आपल्या उणिवांना नजरअंदाज करतात आणि स्वतःलाच योग्य सिद्ध करायच्या प्रयत्नात असतात. पण ३० वर्षे वयाचा काळ हा त्यांच्या स्वभावाला व व्यक्तित्वाला पूर्णपणे बदलून टाकतो.या वयापर्यंत स्त्रियांना साधेपणाचा खरा अर्थ समजतो आणि त्यांची कपड्यांची निवडही पहिल्यापेक्षा खूपच बदलून जाते.

वयाच्या तिसाव्या वर्षी स्त्रिया हे पूर्णपणे समजून जातात की त्रास व वाईट काळ हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. अशात त्या स्वतःचा आत्मविश्वास टिकवणे शिकतात आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देणेही शिकून घेतात. या वयात प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य झळकते आणि त्यांना हे समजलेले असते की त्यांच्या एका हास्याने त्यांच्या कुटुंबाला किती धीर मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *