का मासिक पाळीच्या काळात महिला देवळात जात नाहीत, हे आहे नेमके कारण

आपल्या समाजात अशा अनेक रिती आहेत ज्या आपण इतरांना पाळताना पाहून अनुकरण करायला लागतो. या रीतींना खोलात शिरून जाणून घ्यायला लोक संकोच करतात तर काहींचे असे म्हणणे असते कि ह्या सगळ्या रिती प्रथेने अनादिकाळापासून चालत आल्या आहेत आणि जर त्यांचा आपण विरोध केला तर पितरांचा अपमान होईल.

या अशाच रीतींपैकी एक म्हणजे मासिक पाळीच्या काळात महिलांचा मंदिरात प्रवेश निषेध.शिकलेले लोक हेच मानतात कि मासिक पाळी म्हणजेच पिरेड्सच्या मागे शास्त्रीय कारण आहे पण या समाजात पाळीशी निगडीत अशा अनेक कहाण्या आहेत ज्यांना ऐकून तुम्हालाही विश्वास वाटणार नाही कि अशा प्रकारची वेगळी गोष्ट फक्त हिंदू धर्मातच नाही तर सगळ्याच धर्मांत आढळते. चला पाहूया मुली बायका पाळीच्या काळात देवळात का जात नाहीत.

द्रौपदीने केली याची सुरुवात

महाभारतातून असे कळते कि जेव्हा युधिष्ठीर द्यूताच्या खेळात दुर्योधानासमोर पराजित झाला तेव्हा त्याने शेवटी द्रौपदीलाही दावावर लावले आणि हरले. या विजयावर दुशासन द्रौपदीला शोधत तिच्या शयनकक्षापर्यंत जाऊन पोहोचले पण ती तिथे नव्हती. असे सांगितले जाते कि त्या वेळी तिचा मासिक धर्म चालू होता ज्यामुळे पूर्णवेळ एक वेगळे वस्त्र घालून ती दुसर्या कक्षात राहात होती. पाळीच्या दरम्यान स्त्रीचे शरीर अपवित्र असते हे यावरून लक्षात येते.

इंद्रदेवाच्या कर्मांची महिलांना शिक्षा

पाळीशी संबंधित एक रोचक घटना आहे कि पौराणिक कथांमध्ये नेहमी पाहायला मिळते.भागवत कथेत एका अशाच घटनेचे वर्णन पाहायला मिळते जेव्हा संपूर्ण देवलोकीचे गुरु बृहस्पति देवराज इंद्रावर नाराज झाले. देवतांमध्ये पडलेल्या या फुटीचा फायदा घेत दानवांनी देवलोकावर हल्लाबोल केला आणि इंद्रदेव त्यांचा राजपाट गमावून बसले. या संकटकाळात त्यांना ब्रह्मदेवाशिवाय कोणीच वाचवू शकत नव्हते म्हणून ते ब्रह्मदेवाची मदत मागू लागले. असे कळते कि त्या दिवशी ब्रम्हदेवाने इंद्राला कोण्या ब्राह्मणाची सेवा करण्यास सांगितले ज्यामुळे देवलोकीचे गुरु बृहस्पति प्रसन्न होतील. परमार्शानुसार इंद्र एक ब्रह्मज्ञानीच्या सेवेत मग्न होते तेव्हाच हेही समजले कि त्या ब्रह्मज्ञानीनी एका असुर मातेपोटी जन्म घेतला आहे आणि म्हणून तो असुरांचे समर्थनही करतो. हे सत्य समजल्यानंतर इंद्रांना खूप राग आला आणि त्यांनी त्या ब्राह्मणाची हत्या केली.

या सेवाभावामुळे ते त्यांचे शिष्य झाले होते आणि गुरुहत्या हे एक मोठे पाप असते. म्हणून त्या ब्राह्मणाच्या आत्म्याने एका भयानक राक्षसीचे रूप धारण केले आणि तो आत्मा इंद्राच्या रक्ताच्या पिपासेत भटकू लागला. या प्रकोपापासून वाचण्यासाठी इंद्राने शरणागती पत्करली आणि एक लक्ष वर्षांपर्यंत ते भगवान विष्णूंच्या साधनेत राहिले. भगवान विष्णूच्या प्रसन्न होण्याने त्यांची अर्धी पापे तर धुतली गेली पण अर्धी पापे अजूनही त्यांच्या डोक्यावर तशीच राहिली.

यावेळी इंद्राने जल झाड भूमी आणि स्त्री या चार जणांकडून मदत मागितली आणि पापाचे धनी होण्याची विनंती केली.सगळे यासाठी तयार झाले पण त्याबदल्यात त्यांनी काही वरदान मागितले. तेव्हा इंद्राने जलाला सदैव पवित्र राहायचे वरदान दिले. झाडाला पुन्हा एकदा उभे राहायचे वरदान मिळाले आणि धरतीला कोणतीही जखम सहन करण्याची शक्ती मिळाली. आणि स्त्रीला मिळाले कामवासनेचा सगळ्यात जास्त आनंद घेण्याची क्षमता. पण वरदानाच्या बदल्यात पाप घेण्याचीही अट ठेवली होती ज्यामुळे पाण्याच्या वरच्या थराला अ[अपवित्र मानले जाते, झाडे वाकू शकत नाहीत, जमीन ओसाड राहते आणि स्त्रियांना मासिक पाळी येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *