किंग कोब्राला वाचवण्यासाठी तरुणाने घेतली विहिरीत उडी, काय घडले नंतर… पहा व्हिडिओ

या जगात असे लोक असतात जे दुसर्याचा जीव घ्यायला टपलेले असतात पण असेही लोक असतात कि जे दुसर्याचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालायलाही तयार होतात. आणि असे करण्यास ते कधीही घाबरत नाहीत. असाच एक विडीयो हल्ली वायरल होतो आहे. हा विडीयो त्या तरुणाचा आहे ज्याने संपूर्ण गावाचा जीव वाचवला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून. जरा विचार करा, घरात जर साप आढळला तर आपली काय अवस्था होईल ?अशा वेळी काहीच सुचत नाही आणि त्यातला त्यात तो किंग कोब्रा असेल तर मग काय बघायलाच नको.

त्याच्या समोर जायचेही धाडस होणार नाही. पण एका धाडसी माणसाने असे काही करून दाखवले कि ज्यामुळे त्याला सगळे जग सलाम करते आहे. सोशल मिडीयावर फिरणारी ही छायाचित्रे कर्नाटकातील एका गावातील आहेत जिकडे एक विषारी साप विहिरीत पडला. विहिरीचे पाणी विषारी झाल्याच्या भितीने लोक सैरावैरा पळू लागले. आणि साप विहिरीच्या बाहेर पडण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करत होता पण त्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरत होते.

साप अशा स्थितीत होता कि धड अतः राहू शकत नाही आणि बाहेर पडता येत नाही. तो लोकांना घाबरून बाहेर यायला घाबरत होता आणि लोक त्याच्या विषाला घाबरत होते. गावात ही एकाच विहीर असल्याने पाण्याची समस्या झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी गावातला एक युवक विहिरीत उतरून सापाला बाहेर काढायला तयार झाला.काही तयारी न करता तो विहिरीत उतरला. फक्त एका दोरखंदाच्या सहाय्याने आत गेलेला युवक खूप धाडसी सिद्ध झाला. त्याने आत उतरून छडीच्या सहाय्याने त्या सापाला बिळातून बाहेर काढले.

ज्या विहिरीत संकटकाळी पळायला जागाही नसते त्या विहिरीत या युवकाने फक्त एका छडीच्या सहाय्याने सापाला बाहेर काढले. या सापाला विहिरीतून बाहेर काढताना त्याला खुप कष्ट करावे लागले. यादरम्यान अनेकदा साप छडीपासून सुटत होता पण त्या युवकाने हार मानली नाही. कसेही करून एका दुसर्या दोर्रीला लपेटून त्याने सापाला बाहेर काढले.

हा साप दिसायला इतका भयानक होता कि कोणीही घाबरून जाईल. गावकर्यांनी त्या सापाला जंगलात सोडले तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *