केसगळतीने त्रस्त आहात ?  ही एक युक्ती वापरा आणि पहा कमाल.

 

केस गळणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. बर्याच लोकांना याचा त्रास असतो. त्यांना रोज उशीवर, फरशीवर , कंगव्यात किंवा खांद्यावर शेकड्याने तुटके केस दिसून येतात.अंघोळ करतानाही लोकांचे अनेक केस तुटतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मग ते अनेक महागडे एंटी हेयर फॉल शैम्पू किंवा उपचारांचा आधार घेतात पण त्याने काहीच फरक पडत नाही. अखेरीस निराश होऊन ते या समस्येसह तडजोड करतात.

केसांचे तुटणे  ही एक सामान्य समस्या आहे पण जेव्हा तुटलेल्या केसांच्या जागी नावे केस येत नाहीत तेव्हा त्याला आपण हेयर फॉल म्हणतो. पण घाबरू नका, जर आपण या समस्येचा सामना करत असाल तर आमच्याकडे एक असा चमत्कारिक उपाय आहे जो केल्यानंतर तुम्ही आमचे आभार नक्कीच मानाल.या उपायासाठी जि वस्तू आवश्यक आहे ती  फार स्वस्त व जवळपास प्रत्येक घरात आढळते. आपण ज्याबद्दल बोलतोय ते दुसरे  काहीही नाही परंतु आपल्या स्वयंपाक घरात आढळणारा  कांदा आहे. होय,तुम्ही बरोबर वाचत आहात.जर आपल्याकडे कांदा असेल तर आपण केसगळतीच्या  समस्येपासून सुटका करून घेऊ शकता.

खरं तर, शास्त्रज्ञांच्या मते, कांद्याच्या रसात डाएट्री सल्फर आढळते ज्यात अमीनो ऍसिड असते जो एक महत्त्वाचा घटक आहे. सल्फर-समृध्द प्रथिने, विशेषत: केराटिन, केस वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.एवढेच नाही तर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ए आणि ई यांचे चांगले स्रोत मानले जातात. यांमुळे केस पातळ होत नाहीत  आणि केसात कोंडाही होत नाही. म्हणून बहुतांश लोक त्यांच्या डोक्यात आणि केसांमधे कांद्याचा रस लावतात.यात असलेल्या सल्फरमुळे केस दाट व मजबूत होतात व केसांचे गळणे आणि तुटणे खूप कमी होते.पण कांद्याचा रस नुसताच लावायचा नसतो , तो लावायची एक पद्धत आहे.पाहूया कोणती पद्धत आहे ती.

या कृतींचे  अनुसरण करा

 

  • सगळ्यात आधी कांद्याची साले काढून त्याचे लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
  • नंतर वाटलेला कांदा एका सुती कपड्यात ठेवून त्याचा सगळं रस एका वाडग्यात पिळून घ्या.
  • कांद्याच्या या रसाला आपल्या दैनंदिन वापराच्या तेलात मिसळा.
  • कांद्याचा रसात आपण नारळ बदाम किंवा इतर कोणत्याही तेलात मिसळू शकता. यानंतर, हे मिश्रण केसांच्या मुळांवर व्यवस्थित लावा आणि नंतर हलक्या हाताने मसाज करा.
  • हे डोक्यावर एक तास राहू द्या व नंतर शॅम्पूने धुवा.आठवड्यातून 2-3 वेळा या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.

 

परिणाम पाहून तुम्ही थक्कच व्हाल .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *