कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनी सगळ्यांना रडवले

नवी दिल्ली – कॉमेडीने लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणार्या प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी सोशल मीडियावर एक असा विडीयो शेयर केला आहे ज्यात असे काही आहे जे पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावत आहेत. आपल्याला सगळ्यांनाच हे माहिती आहे कि कॉमेडी स्टार राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी अभिनयासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत पण कधीतरी ते विनोदातून बाहेर येऊन देशातील गंभीर विषयावरही बोलतात. राजू श्रीवास्तव यांनी केलेले गंभीर विषयावरील भाष्य चर्चेचा विषय ठरले आहे.

गायीबद्दल व्यक्त केले दुख्ख

आपल्या विनोदी वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजू श्रीवास्तव यांनी गायीबद्दल दुख्ख व्यक्त केले आहे.कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही कि राजू कधी इतके गंभीर होऊ शकतात. वास्तविक युपी च्या कानपूर शहरात राहणारे राजू श्रीवास्तव त्यांच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.

आपल्या विनोदी कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले आणि नाव कमावले. पण आज ते काही लोकांमुळे नाराज आहेत असे वाटते. खरेतर या विनोदवीराने सोशल मीडिया प्लेटफार्म यू-ट्यूब वर एक असा भावुक विडीयो शेयर केला आहे ज्यात राजू एक म्हातारी गाय बनलेले दिसत आहेत. या विडीयोच्या माध्यमातून राजू यांनी गायीच्या फायद्यांची माहिती करून दिली आहे. गाय ही आपली माता आहे तिला विकू नका, कसायला देऊ नका , कापू नका हा संदेश सगळ्या जगाला राजू विडीयो मार्फत पोहोचवत आहे.

सोशल मीडिया वर झाला वायरल वीडियो –
राजू श्रीवास्तव ने शेयर केलेला हा वीडियो सोशल मीडियावर खूप फिरत आहे. या विडीयोमार्फत त्यांनी लोकांना बरेच काही सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला आहे. या विडीयोत त्याने असे दाखवले आहे कि कशाप्रकारे एक म्हातारी गाय कसायला विकल्यावर आपले प्राण वाचवू पाहते आहे. राजू या विडीयोत स्वतः एक गाय बनले आहेत.

या विडीयोत आपण हे पाहू शकता कि कशाप्रकारे ही म्हातारी गाय आपल्या मालकाला हे सांगते आहे कि तू माझे दुध प्यायला आहेस,तुझ्या मातेसम आणि आता तू मला विकू नकोस कारण हा कसाई मला कापून टाकेल. गायीच्या बाबतीत लोकांच्या संवेदना जागृत करण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राजूने हा विडीयो बनवून वायरल केला आहे. हा विडीयो तुम्ही त्याच्या फेसबुक पेजवर किंवा यू ट्यूबवरही पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *