कोण होती महेंद्र सिंह धोनीची पहिली गर्लफ्रेंड ? आणि कसा झाला तिचा मृत्यू ?

भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दलतर सगळयांनाच माहिती आहे कि कसे त्यांनी भारतीय क्रिकेट तम मध्ये स्वतःला सामील करून घेतले व देशाला वर्ल्ड कपही मिळवून दिला. फक्त व्यावसायिक नाही तर लोकांना धोनीच्या वैयक्तिक आयुष्यातीलही थोडी फार माहिती आहे. साक्षी आणि त्याची प्रेमकहाणी जवळपास प्रत्येक वाहिन्यांवर दाखवली गेली आहे. परंतु ह्या मिस्टर कुलच्या आयुष्यात फक्त इतकेच रंजक किस्से नाहीत.त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी इतक्या रंजक आहेत कि आता त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही तयार झाला आहे. या चित्रपटात असे दाखवले गेले आहे कि धोनी याची एक गर्लफ्रेंड होती जिचा मृत्यू एका कारच्या अपघातात झाला. चित्रपटात ही भूमिका दिशा पाटनी ने निभावली होती पण तुम्हाला माहिती आहे का ही मुलगी कोण होती ते ? चला पाहू आणि जाणून घेऊ सविस्तर माहिती.

या मुलीचे खरे नाव प्रियांका झा असे आहे. चित्रपटात प्रियांका झा ची भूमिका दिशा पतणी हिने उत्तमरीत्या निभावली आहे.ही प्रियांका धोनीच्या आयुष्यात तेव्हापासून होती जेव्हा धोनी त्यांच्या करियरमध्ये मेहनत घेत होते. पण चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी जेव्हा धोनीला प्रियांकाच्या बाबत विचारले गेले तेव्हा तो मोठ्या मुश्कीलीनेच प्रियांकाचा उल्लेख करू शकला.

मिडिया ने दिलेल्या अहवालानुसार धोनी आणि प्रियांका एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि एकमेकांशी लग्नही त्या दोघांना करायचे होते. या दोघांची प्रेमकहाणी जेव्हा चालू होती त्याच दरम्यान धोनीची निवड भारताच्या टीम मध्ये झाली.पण त्यानंतर काही असे घडले कि ते दोघे कायमचे एकमेकांपासून वेगळे झाले. काय घडले असेल असे नेमके ?

हाच तो काळ होता जेव्हा धोनी हा एका परदेशदौर्यावर गेलेला होता आणि त्याच वेळी प्रियांकाचा कर अपघातात मृत्यु झाला. धोनीला हे तेव्हा समजले जेव्हा ते दौर्यावरून परत आले. त्यांना ही बाटी मिळताच खूप मोठा धक्का बसला. त्या वेळी त्यांच्या जवळच्या लोकांना असेही वाटत होते क्की धोनी कदाचित आता खेळणे सोडून देतील पण तसे घडले नाही. सकारात्मक विचार करून धोनींनी या घटनेला आपली कमजोरी नाही तर ताकद बनवली आणि त्यानंतर धोनी केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगातील एक उत्तम क्रिकेटर बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *