कोरफडीची शेती करण्यासाठी सोडली सरकारी नोकरी, आज बनलाय करोडपती

हरीश धनदेव प्रगत भारताचे असे शेतकरी आहेत जे इंजीनियर तर आहेतच अन उत्तम इंग्रजीही बोलतात.२०१२ साली जयपुरमधून बीटेक केल्यानंतर जैसलमेरच्या हरीशने एमबीए करण्यासाठी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण २०१३ मध्ये सरकारी नोकरी मिळाल्यानंतर त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले. हरीश जैसलमेरच्या नगरपालिकेत जूनियर इंजीनियर पदावर रुजू झाले जिकडे दोन महिने नोकरी केल्यानंतर त्यांचे मन नोकरीतून हटले. हरीश दिवसरात्र नोकरीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा विचार करू लागले. काही वेगळे करण्याचा ध्यास इतका वाढला कि त्यावर ते संशोधन करू लागले.

स्वतःसाठी काहीतरी करण्याचा शोध घेतानाच त्याची भेट बीकानेर एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मध्ये एका व्यक्तीशी झाली. हरीशला राजस्थानातील पारंपारिक शेते ज्वारी बाजरी यापेक्षा काहीतरी वेगळं करायचे होते. बोलताना त्यांनी हरीशला कोरफडीच्या शेतीची कल्पना सुचवली. एकदा तो परत दिल्लीला गेला जिकडे त्याने शेतीविषयक एका प्रदर्शनात त्याने शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि नव्या काळातील शेतीची माहिती मिळवून घेतली आणि तेव्हाच पक्के ठरवले कि तो कोरफडीची शेतीच करणार आहे. त्याला त्याच्या नव्या आयुष्याची दिशा मिळाली होती. दिल्लीहून तो जेव्हा बिकानेरला परत गेला तेव्हा जाताना कोरफडीची २५००० रोपे घेऊनच गेला.

जेव्हा त्याने ही कोरफडीची शेती सुरु केली तेव्हा काही लोकांनी त्याला असेही सांगितले कि जैसलमेरच्या काही लोकांनी ही शेती करायचा प्रयत्न केला आहे पण त्यांच्या प्रयोग फसला आणि त्यांना यश मिळाले नाही. लोकांनी पिक घेतले नाही मग त्या शेतकऱ्यांनी दुसरी शेती सुरु केली. हे ऐकून हरीशच्या मनात थोडी शंका निर्माण झाली पण त्याने याबाबत थोडी माहिती मिळवली. मग त्याला असेही समजले कि या शेतकऱ्यांनी शेती तर सुरु केली, रोपे लावली पण ते खरेदी करणाऱ्यांशी संपर्क साधू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांची रोपे विकली गेली नाहीत. हे कारण समजल्यानंतर हरीशला समजले कि त्याला फक्त शेतीच नाही तर मार्केंटिग स्किल वरही तितकेच लक्ष द्यावे लागेल म्हणजे त्याची रोपे निट विकली जातील आणि प्रगती साधता येईल. योग्य दिशेने त्याची वाटचाल सुरु झाली. या त्याच्या कार्यात घरच्यांचा सहभाग होता.

त्याने मेहनतीने शेती केली आणि आज तो करोडपती झाला आहे, अनेक तरुणांसाठी आदर्श बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *