3000 पेक्षा जास्त सापांचे दंश सहन करणारा आणि 100 पेक्षा जास्त किंग कोब्राना वाचविणारा सर्पमित्र!

केरळ मधील वावा सुरेश हे जगभरात ‘स्नेक मास्टर’ नावाने ओळखले जातात. ते एक असे सर्पमित्र आहेत ज्याच्या इशार्यावर साप आणि किंग कोब्र्यासारखे खतरनाक जीव नतमस्तक होतात. ते खेळण्याप्रमाणे सापाशी खेळतात. कोणताही आणि कुठेही विषारी साप असो, पकडायला सुरेशलाच बोलावले जाते. सुरेशबद्दल असे सांगितले जाते कि त्याला एकदा दोनदा नव्हे तर ३००० पेक्षा जास्त वेळा साप चावले आहेत पण त्यांचा धीर कमी झाला नाही.

त्यांना सापांचे हावभाव आणि देहबोलीचा इतका अंदाज आहे कि कोणता साप आता काय करेल हे ते ओळखतात. असेही वाटते कि सापही त्यांच्या सूचना पाळतात. सुरेश ४४ वर्षांचे आहेत आणि ते खूप लहान वयापासून साप पकडण्याचे आणि त्यांना वश करण्याचे काम करत आले आहेत. चित्रात हे दिसते कि कशाप्रकारे ते आणि कोब्रा डोळ्यांनी एकमेकांच्या भावना वाचतात आणि समजून घेतात. आतापर्यंत त्यांनी ३०००० पेक्षा जास्त साप पकडले आहेत त्यातले १०० पेक्षा जास्त कोब्रा आहेत. सापच नाही तर ते वेगवेगळ्या विषारी जीव जंतुना पटकन काबूत आणतात. जगभरात त्यांची किर्ती पसरली आहे. अनेक मालिकांनी त्यांच्यावर चित्रपट बनवले आहेत. यूट्यूब आणि गुगल त्यांच्या माहितीने पूर्ण आहे. त्यांनी ३०००० पेक्षा जास्त सापांना वाचवलेही आहे.

‘स्नेक मैन’ म्हणून प्रसिद्ध असलेले केरळचे वावा सुरेश जगातील सगळ्यात खतरनाक सापांबरोबर राहतात. त्यांना सापांची विशेष आवड असल्यानेच हे नाव त्यांना पडले आहे. केरळ मध्ये सगळ्याच घरात सापांना घरातून काढायला त्यांनाच बोलावले जाते. फेसबुक वरही ते लोकप्रिय आहेत, त्यांनी स्वतःच्या नावाचे एक फेसबुक पेज बनवले आहे ज्याला १४ लाखपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. हीच त्यांच्या प्रसिद्धीची पोचपावती आहे. रोज ते सापांशी संबंधित पोस्ट करत राहतात आणि त्यांच्या पोस्त हजारोंच्या संख्येने नुसत्या लाईकच होत नाहीत तर शेयरही होतात.

या दरम्यान अनेक विषारी साप त्यांना चावले आहेत पण त्यांच्यावर या विषाचा जास्त परिणाम झाला नाही. सुरेशने आतापर्यंत पकडलेल्या सापंत ६५ कोब्राही समाविष्ट आहेत. विशेष गोष्ट अशी कि कोण कोब्रा हा जगातला सगळ्यात क्रूर आणि विषारी साप मानला जातो, तो जीवही घेऊ शकतो. केरळ सरकारकडून त्यांना नोकरीचा प्रस्तावही आला होता पण त्यांनी तो अमान्य केला.

त्याचे असे म्हणणे आहे कि जर तो नोकरी करू लागला तर त्याला सापाची मदत करण्यात अडचण येईल. साप हा त्याच्या आयुष्यातला अगदी लहानपणापासूनचा अविभाज्य भाग आहे. ते हेही म्हणतात कि त्यांना माहिती नाही कि त्यांना सापांची इतकी आवड का आहे. लहानपणी ते हे बघायचे कि लोक किती वाईट पद्धतीने सापांना मारायचे त्याच वेळी त्यांच्या मनात संवेदना जागी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *