गरोदर आहात ? मग या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

गरोदर आहात ? मग या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.

गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो.या काळात जर योग्य ती काळजी घेतली तर प्रसूती तर सुलभ होतेच आणि बाळाचे आरोग्यही चांगले राहाते. जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमचे गर्भारपण सुलभ व सुरक्षित जावे तर या गोष्टींची काळजी नक्कीच घ्या. काही गोष्टी अशा आहेत ज्यांची काळजी घेतली तर नक्कीच तुमचा खूप फायदा होईल.

१. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी फोलिक एसिड योग्य प्रमाणात घेतले गेले पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये हे भरपूर प्रमाणात असते. यांमुळे बाळाचा बौद्धिक विकास योग्य तऱ्हेने होतो.

२. गर्भारपणात ताजी फळे खाल्ली पाहिजेत. फळे खाण्याआधी स्वच्छ धुवून घ्या. नाहीतर तुम्हाला आजारपण येऊ शकते.

३. गर्भारपणात अंडी, मासे यांचे सेवन जरुर करावे. चिकन किंवा मासे खाल्ल्याने बाळाची त्वचाही चांगली होते त्याशिवाय बाळाचा बौद्धिक विकास नित होतो. पण हे पदार्थ पूर्णपणे शिजवले आहेत ना याची खात्री करून घ्या. हे पदार्थ अर्धे कच्चे खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

४. जितके शक्य होतील तितके प्रोटीनचे सेवन करावे.प्रोटीन बाळाच्या विकासात खूप मदत करते. तुम्हाला हवे असल्यास डाळी, बिया आणि दुध तुमच्या आहारात समाविष्ट करा.यांमुळे शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन तयार होईल जे बाळाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे.

५. तुमचे खाणे पिणे जसे नीट होणे आवश्यक आहे तसे हेही आवश्यक आहे कि तुम्हाला लागणाऱ्या लसी टोचून घेणे. गर्भारपणात या लसी टोचून घेतल्याने तुमच्या बाळाला कोणत्याही आजाराचा संसर्ग होत नाही. या लसी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी लावून घ्या.

६. गरोदरपणात जंक फूड खाणे टाळा. त्याने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यात खूप फात्स असतात ज्याने तुमचे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका संभवतो.

७. गर्भावस्थेत संपूर्ण आहार घेणे खूप गरजेचे आहे. शरीराला सगळे पोषक तत्व योग्य त्या प्रमाणात मिळाले तर बाळाचा विकास व्यवस्थित होईल आणि तुमचेही आरोग्य चांगले राहील.

गरोदरपणात योग्य आहार आणि व्यायाम केले तर तुमची प्रसूती सुलभ तर होईलच तसेच बाळाचे आणि त्याच्या आईचेही आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अशा आहे. नक्की तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *