गोरिलाच्या पिंजर्यात चुकून पडले चार वर्षांचे बाळ , बघा काय घडले त्यानंतर

आपल्या आयुष्यात कधी काय घटना घडेल ते नक्की सांगता येत नाही.काही वेळा असे काही घडते कि घटना घडल्यावर स्वतःला सांभाळायची संधीही मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला एक अशी भयानक घटना सांगणार आहोत ज्यात एक बाळ अचानक गोरिलाच्या तावडीत सापडले.प्राणीसंग्रहालयात घडलेले काही किस्से आपल्याला माहीतच असतील ज्यात माणसाच्या चुकीने जनावरांना शिकारीची आयतीच संधी मिळते. तुम्हाला आजही दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयातील ती घटना आठवत असेल. आज आम्ही तुम्हाला एका अशा घटनेबाबत सांगणार आहोत जी खूप वायरल झाली आहे.

सिनसिनाटीमधील एका प्राणीसंग्रहालयात घडलेली ही एक घटना आहे जिकडे चार वर्षांचा मुलगा १० १२ फुट खोल असलेल्या अशा पिंजर्यात पडला आणि तकडे त्याला एका गोरीलाने पकडले. ही घटना खूप भयावह होती आणि मुलाला वाचवण्यासाठी त्या गोरिलाला गोळी घालावी लागली. जेव्हा हा मुलगा चुकून त्या पिंजर्यात पडला तेव्हा तिकडे जमलेल्या लोकांनी आणि प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढायचे खूप प्रयत्न केले. पण त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ होते. सगळ्यांना असे वाटले कि गोरिला आता त्या मुलाला मारून टाकेल आणि म्हणूनच त्या गोरिलाला गोळी मारावी लागली. ज्यामुळे गोरिलाचा दुर्दैवी अंत झाला. हा विडीयो खूप वायरल होत आहे आणि हा पाहून सगळेच कर्मचार्यांच्या प्रसंगावधानाची प्रशंसा करत आहेत.

ही घटना घडल्यानंतर गोरिलाला गोळी मारून त्या मुलाचे प्राण वाचवण्याच्या निर्णयाबाबत डायरेक्टर थाने मेनार्ड यांनी असे सांगितले कि प्राणीसंग्रहालयात असे प्रकार बरेचदा होत असतात आणि त्याची कल्पना तिकडच्या कर्मचाऱ्यांना असतेच. आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी एक सेवा संघ कार्यरत असतो जो अशा वेळी काम करतो आणि अंमलबजावणी करतो. अशा प्रसंगात योग्य तो निर्मय घेतो.

या संघाच्या कार्यकर्त्यांनी असे सांगितले कि जेहा त्यांना कळले कि मुलाच्या जीवाला धोका आहे तेव्हा त्यांनी या हरम्बे नावाच्या गोरिला माकडाला गोळी मारण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. हा त्यांच्यासाठी एक कठीण निर्णय होता पण तो निर्णय योग्यच होता. हे बाळ साधारण १० मिनिटे त्या गोरिलाच्या तावडीत होते आणि त्यांच्या असे लक्षात आले कि आता काही याचे प्राण वाचणार नाहीत आणि म्हणूनच त्यांना असा कठीण निर्णय घ्यावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *