चला हवा येऊ द्या फेम विनित भोंडेचा झाला साखरपुडा पहा व्हिडिओ

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात कधी हवालदार म्हणून तर कधी लहान मुलगा म्हणून प्रेक्षकांना पोटधरुन हसवणारा अभिनेता विनीत भोंडे आता लवकरच वैवाहिक आयुष्यात पदार्पण करणार आहे. विनीतला आता त्याची साताजन्माची जोडीदार गवसली असून दोन दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला. मुळचा औरंगाबादच्या असलेल्या विनीतच्या भावी वधूचे नाव सोनम पवार आहे. सोनम मुळची सोलापूरची असून औंरगाबाद येथे विनीतच्या घरी दोघांचा साखरपुडा झाला. अगदी घरगुती समारंभात दोघांनी रिंग एक्सचेंज केल्या.

औरंगाबाद येथे होणार आहे लग्न…

विनीत आणि सोनम यांचे हे अरेंज्ड मॅरेज आहे. अलीकडेच दोघांच्या कुटुंबीयांची पसंती झाली आणि साखरपुडा करण्याचे निश्चित झाले. या घरगुती समारंभात झालेल्या साखरपुड्याला विनीत आणि सोनमच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र हजर होते. आता येत्या 4 मार्च रोजी औरंगाबाद येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

पुण्यात शिकतेय सोनम…

मुळची सोलापुरची असलेली सोनम सध्या पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे.

गेल्या 10 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे विनीत…

विनीतने अभिनयाच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत उत्तम यश मिळवले आहे. मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्रात विनीतने बी.ए. केले आहे. निशिकांत कामत यांच्या ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून विनीतचा सुरु झालेला प्रवास आजही यशस्वीरित्या सुरु आहे.

पहा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *