चीनी मुलीचे जुळले भारतीय मुलाशी सुत आणि नंतर त्यांनी चक्क….

अनादिकाळापासूनची एक म्हण आहे कि खरे प्रेम हे कशाचीच पर्वा करत नाही अगदी हद्दीची सुद्धा नाही. या म्हणीला खरे करून दाखवले आहे भारताच्या अजय आणि चीनच्या लुलू या दोघांनी. हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते, तिकडे त्यांची ओळख वाढली, मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले. प्रेम झाल्यानंतर त्यांनी घरच्या लोकांच्या परवानगीने लग्न करायचा निर्णय घेतला. त्या साठी लुलू तिच्या घरच्या लोकांबरोबर भारतात आली आणि त्यांनी चक्क वैदिक पद्धतीने लग्न केले.

सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी कि दोघांच्या कुटुंबाला या लग्नाने आनंद झाला आहे. जेव्हा अजय च्या कुटुंबीयांनी लग्नाचे विधी आणि रीतीभाती पूर्ण करण्याची इच्छा दर्शवली तेव्हा लुलूचे कुटुंबीय चीनवरून भारतात आले जेणेकरून ते रीतसर त्यांच्या मुलीचे कन्यादान करू शकतील. या नंतर या दोघांच्या अनोख्या विवाहाची छायाचित्रे सोशल मिडीयावर फिरू लागली आणि सगळ्या लोकांना ती चित्रे खूपच आवडली. हा विवाह आजही चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे अजय हा राजस्थानच्या सवाईमाधोपुर जिल्ह्यातील रामसिंहपुरा गावातील एक रहिवासी आहे. त्याने आईआईटी मधून इंजीनियरिंग पूर्ण केले आहे. त्यांनतर तो चीनला निघून गेला व एका सॉफ्टवेयर कंपनीत काम करू लागला. तिथेच त्याची भेट लुलूशी झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात कसे झाले समजलेच नाही. लुलुला भारतीय संस्कृतीचे खूप आकर्षण तर आहेच पण प्रेमही आहे कारण इकडे लग्नाचे बंधन हे केवळ आयुष्यभराचे नाही तर जन्मजन्मांतरीचे मानले जाते. त्यांचे प्रेम जेव्हा जमले तेव्हा ही गोष्ट सगळ्यात आधी त्यांनी विश्वासाने घरच्यांना सांगितली आंनी आश्चर्य म्हणजे घरचे या लग्नाला आनंदाने तयारही झाले. दोघांच्या मैत्रीने सुरु झालेले हे नाते आता पती पत्नीच्या पवित्र बंधनात बांधले गेले आहे.

या अनोख्या विवाहाची चर्चा आजूबाजूलाच नव्हे तर सोशल मिडीयावारही जोरात सुरु आहे. लोकांना या लग्नाचे खूपच कौतुक वाटत आहे. विवाह जिथ संपन्न झाला ते ठिकाण गंगापुर सिटी जिथेही अनेक लोक या नवदाम्पत्यास भेट द्यायला व पाहायला लांबून लांबून आलेले होते. सोशल मिडीयावारही लोकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आमच्याकडूनही या नवदाम्पत्याला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.नांदा सौख्यभरे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *