जगातले एकमेव मंदिर,जिकडे हत्त्ती नाही तर मानवी चेहऱ्यात आहे गणपती !

हिंदू धर्मानुसार भारताच्या प्रत्येक कानाकोपर्यात गणपतीची पूजा ही केली जाते. गणपतीला सगळ्यात प्रथम पूजले जाते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजेने केली जाते.असे म्हणतात कि गणपतीच्या पूजेने सुरुवात केलेले कोणतेही कार्य सिद्धीस जाते.म्हणूनच कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही गणपतीच्या पूजेने होते.

देशात गणपतीची जितकी मंदिरे आहेत त्या सगळ्यात तुम्ही गणपतीचे गजमुखी रूप पाहिले असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबत सांगणार आहोत जिथली गणपतीची प्रतिमा गजमुख रुपात नाही तर मानवी रुपात लावली आहे. होय !आम्ही ज्या मंदिराबाबत सांगत आहोत ते मंदिर दक्षिण भारतात आहे. गणपतीच्या या मंदिराला आदि विनायक म्हणून ओळखले जाते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि संपूर्ण जगात हे असे एकाच मंदिर आहे जिथे गणपतीची मानवी रूपातील प्रतिमा स्थापन केलेली आहे.

याच वैशिष्ट्यामुळे हे मंदिर जगातल्या सगळ्या मंदिरांमध्ये वेगळे आहे. याशिवाय या मंदिराची एक खास गोष्ट अशी आहे ज्यामुळे हे मंदिर आकर्षण बनले आहे.हे एकमेव गणेश मंदीर असे आहे जिथे लोक आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करतात.इकडचे लोक असे मानतात कि याच मंदीरात भगवान श्रीरामांनीही त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अशीच प्रार्थना केली होती.

आजही अनेक लोक या मंदीरात आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करायला येतात.तामिळनाडू मध्ये असलेले हे देऊळ जरी जास्त मोठे नसले तरी आपल्या या खास गोष्टीसाठी जगप्रसिद्ध आहे.सर्वसाधारणपणे पितृदोष निवारण करण्यासाठी लोक नदीकिनारी तर्पण करायला जातात अन या मंदिराच्या या वैशिष्ट्यामुळे या ठिकाणचे नाव तिलतर्पणपुरी ठेवले गेले आहे. तामिळनाडूच्या कुटनूर येथून जवळपास २ किलोमीटर अंतरावर तिलतर्पणपुरी नावाचे एक ठिकाण आहे जिथे गणपतीचे आदि विनायक मंदिर वसलेले आहे.

तुम्हाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल कि या मंदिराचे नाव तिलतर्पणपुरी ठेवण्यामागे एक विशेष कारण आहे. तिलतर्पण पुरी हा शब्द दोन शब्दांना जोडून तयार झाला आहे. तिलतर्पण शब्दाचा अर्थ आहे पूर्वजांना समर्पित आणि पुरी म्हणजे शहर, म्हणजे असे शहर जे पूर्वजांना समर्पित असेल. तिलतर्पणपुरी मध्ये गणपतीच्या नरमुखी मंदिराच्या बरोबरच शंकराचेही मंदिर आहे. या मंदिराच्या मधोमध शंकराचे मंदीर आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर ;लगेच गणपतीचे नरमुखी मंदिर नजरेस पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *