जर असेल तुमच्या बोटाच्या नखावर अर्धचंद्र , तर आहात तुम्ही नशीबवान

नखावर अर्धचंद्र

हस्तरेखाशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांत अनेक अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला भविष्य समजू शकते.त्यायोगे तुम्ही भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज तरी नक्की बांधू शकता.आपल्या हात व पायात अनेक अशा रेषा असतात ज्या आपल्याला जीवनाशी निगडीत कोणत्या ना कोणत्या गोष्टी जरूर सांगतात. या रेषांचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो.हस्तरेषाशास्त्र ज्याला इंग्रजीत palmistry असे म्हणतात, यानुसारतर व्यक्तीची नखेसुद्धा त्याच्या जीवनाशी संबंधित अनेक रहस्य उलगडतात. तुम्ही कधी नखे नीट पहिली असतील तर हे लक्षात आले असेल की त्यावर पांढर्या रंगाची अर्धचंद्राकृती खूण असते, हे चिन्ह प्रत्येकाच्याच नखांवर नसते. नखांवर बनलेले ही चिन्हे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दलची अनेक रहस्ये उलगडतात. आज आपण याच चिन्हांबद्दल बोलणार आहोत. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या नखांवर हे चिन्ह असते ती व्यक्ती खूप नशीबवान असते. या लेखात आम्ही तुम्हाला हे सांगू की नखांवर असलेल्या अर्धचंद्राकृती चिन्हाचा अर्थ काय होतो. चला पाहूया.

नखावरील अर्धचंद्राचा अर्थ

ज्या लोकांच्या नखांवर अशा प्रकारचे चिन्ह असते त्यांचे आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत होते. वास्तविक या लोकांना सुरुवातीला खूप परिश्रमांतून जावे लागते पण मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते. हे लोक जितके श्रम घेतात तितकेच जास्त चांगले आयुष्य जगतात. नखांवर या प्रकारचे चिन्ह असलेले लोक जीवनसाथीच्या बाबतीत खूप नशीबवान असतात.यांचा जो जीवनसाथी बनेल त्यांचे मन शुद्ध असेल. एवढंच नाही तर तर ते तुमच्यावर खूप निस्सीम प्रेमही करतील. पण त्या बदल्यात तुम्हालाही त्यांची तितकीच काळजी घ्यावी लागेल.कारण ते जितके प्रेम तुमच्यावर करतील तितक्याच प्रेमाची अपेक्षा तुमच्याकडून ठेवतील.

ज्यांच्या नखांवर अर्धचंद्राची खून असेल ते लोक खूपच मेहनती असतात. ते कठोर परिश्रम करायला घाबरत नाहीत.हे लोक आपल्या कामाच्या बाबतीत दृढनिश्चयी असतात.एकदा जो निश्चय करतात तो पूर्ण करूनच सोडतात.ज्यांच्या नखांवर असे चिन्ह असते त्यांना आयुष्य काहीतरी मोठे बक्षीस देणार असते. पण थोडे प्रयत्न तुम्हाला ते मिळवायला करावे लागतील.थकून जाऊन हार न मानता प्रयत्न चालू ठेवा.

अशा लोकांना देशासाठी काहीतरी मोठे करण्याची संधी मिळते. त्यांनी फक्त इमानदारीने आपले काम करत राहावे आणि चालून आलेली संधी कोणत्याही परिस्थितीत सोडू नये.

पाचही बोटांच्या नखांवर अर्धचंद्राचा अर्थ

ज्या लोकांच्या तर्जनीच्या नखावर अर्धचंद्र असतो त्या लोकांची प्रगती जलदगतीने होते. जर चंद्राचे चिन्ह हाताच्या मधल्या बोटावर म्हणजे अग्ल्यात मधल्या बोटावर असेल तर त्याचा अर्थ असा कि तुम्हाला यंत्र किंवा उद्योगासंबंधी कार्यात नक्कीच यश मिळेल.ज्या लोकांच्या अनामिकेच्या नखावर अर्धचंद्र असतो ते लोक आपले भावी आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगतात. त्यांचे भविष्य उज्वल असते.

जर तुमच्या सगळ्यात लहान बोटाच्या नखावर चंद्राची खूप असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

जर चंद्राचे चिन्ह अंगठ्याच्या नखावर बनलेले असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला लौकरच एक चांगली बातमी मिळणार आहे ज्याने त्याची प्रगती होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *