जर तुमच्या हातातही असेल ‘x’ चिन्ह तर या मागे आहे एक गुपित !

जर तुमच्या हातातही असेल ‘x’ चिन्ह तर या मागे आहे एक गुपित !

ज्योतिषशास्त्र एक प्रकारची अशी विद्या आहे ज्यात अनेकप्रकारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते आणि काही प्रमाणात त्याला प्रमाणही मानले जाते.हस्तरेखा ज्योतिष शास्त्राचेही स्वतःचे महत्व आहे. हस्तरेखा ज्योतिषशास्त्रात तळव्याच्या रचनेत आणि त्यात असलेल्या रेषांच्या आधारावर भविष्य वर्तवले जाते.

हस्तरेषा

हस्तरेषा वाचनाबाबत पण ज्योतिषी असे मानतात की पुरुषाच्या उजव्या  तर स्त्रीच्या डाव्या हाताच्या रेषा पाहिल्या जातात.तुम्ही अनेक वेळा तुमचा हात ज्योतिष्याला दाखवला  असेल व तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या हातावर अनेक रेषा व अनेक प्रकारची चिन्हे असतात ज्यांना पाहूनच ज्योतिषी भविष्य सांगतात. या संदर्भात तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील . या पाहूया हस्तरेषांशी निगडीत काही न माहित असलेल्या गोष्टी.

 हस्तरेषा म्हणजे काय?

हस्तरेखेचा प्राचीन ज्ञानाच्या आधारावर,हस्तरेषा माणसाच्या व्यक्तिमत्व व भविष्यातल्या संभावना जसे की करीयर, आयुष्य, विवाह , धन व आरोग्याविषयी संभावना दर्शवतात.

फलज्योतिषशास्त्राची मुळे भारतीय पार्श्वभूमीशी निगडित आहेत.या काळातील विविध शास्त्रांच्या मते हजारो वर्षांपूर्वी हिंदू ऋषी वाल्मिकीने ५६७ अध्याय असलेल्या एका ग्रंथाची रचना केली होती.

हातांच्या रेषा वाचण्याची सुरुवात

इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हस्तरेषा वाचण्याच्या या ज्ञानाची उत्पत्ती भारतातून झाली. त्यानंतर ते ज्ञान चीन, तिबेट, इजिप्त आणि पर्शिया, यूरोपसारख्या इतर देशांमध्ये पसरले.ग्रीसच्या विद्वान अक्सगौरास  आपल्या काळातील भारतीय उपखंडात वास्तव्य करत असताना हस्तकलांच्या ज्ञानाबद्दल जे काही शिकले ते त्याने शेअर केले.

तळहाता मध्ये ‘एक्स’ असणे

इजिप्शियन विद्वानांच्या मते, अलेक्झांडर द ग्रेटच्या हातात ‘एक्स’ चिन्हे दिसत होती. अलेक्झांडर च्या हाताशिवाय हे चिन्ह कदाचितच कोणाच्या हातावर पहिले गेले. असा अंदाज वर्तवला गेला आहे की जगभरात फक्त 3 टक्के लोकांच्या हातावर हे चिन्ह पाहिले जाउ शकते. वास्तविक , मॉस्को विद्यापीठातील हातावर ‘X’ रेषा सापडण्याची उत्पत्ती व या रेषांचा भविष्याशी असलेला संबंध या बाबत एक शोध केला गेला. व्यक्ति व त्यांच्या हातातल्या रेषांमधील परस्पर संबंधांवर एक कागद  तयार केला गेला.

‘एक्स’ चिन्ह असलेले लोक असतात लीडर

मॉस्कोमध्ये झालेल्या या शोधात जीवित व मृत दोन्ही तऱ्हेच्या दोन दशलक्ष लोकांची माहिती गोळा केली आहे. संशोधनानंतर, असे आढळले की ज्यांच्या  हातात X रेषा होती ते मोठे नेते, लोकप्रिय व्यक्ती किंवा नामवंत व्यक्ती होते.

‘X’ चा अर्थ काय आहे?

ज्या व्यक्तींच्या फक्त एका हातात हे चिन्ह आहे ते प्रतिष्ठावान व यशस्वी आहेत.पण ज्या व्यक्तींच्या द्ल्न्ही हातात या रेषा असतात ते मोठे उद्योगपती असतात.हे त्या लोकांपैकी असतात ज्यांना मृत्यू नंतरही लक्षात ठेवले जाते.

हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते की आपल्या हातांच्या रेषा खूप बोलतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *