ज्या घरात असतील हे पाच दोष , त्या घरात टिकणार नाही संपत्ती, भाग्यही साथ देणार नाही.

अनेकदा व्यक्तीची केलेली कर्मेही निष्फळ ठरतात कारण जीवनात कर्मांच्या बरोबरीनेच बाहेरील परिस्थिती आणि माणसाचे भाग्य जबाबदार असते. अशातच जर नियतीची साथ नसेल तर मेहनतीने मिळवलेले धनही टिकू शकत नाही आणि इच्छा असतानाही माणूस सुखी राहू शकत नाही. पण याचबरोबर प्रश्न असा आहे कि भाग्य कोणी कसे काय बदलू शकते कारण त्यापुढे माणसाचे काहीच चालत नाही. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या भाग्याला प्रभावित करतात किवा त्यांचा तुमच्या भाग्यावर शुभ अशुभ परीणाम होतो आणि वास्तुशास्त्र याच बाबतीत सांगते कि कसे तुम्ही तुमच्याच आजूबाजूच्या वस्तूंचा वापर करून तुमचे भाग्य बदलू शकता.

आज आम्ही तुम्हाला त्या वास्तूदोषांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या असण्याने माणूस नेहमी तणावग्रस्त राहातो आणि जर त्यांचे निवारण योग्य वेळी झाले नाही तर श्रीमंतातला श्रीमंतही भिकेला लागू शकतो.

खरे पहिले गेले तर वास्तूचे माणसाच्या आयुष्यात विशेष महत्व असते. आपण त्याकडे लक्ष दिले किंवा नाही दिले तरी आपल्या घरात असलेले वास्तुदोष आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतातच. अशात आपण वास्तूज्ञानाअभावी हे जाणून घेऊ शकत नाही कि कोणत्या कारणाने दुर्भाग्य आपल्या राशीला आले आहे. जेव्हा आपण आपले कर्म आपल्या क्षमतेनुसार करत राहातो पण तरीही त्यांचे योग्य ते फलित आपल्याला मिळत नाही.अशात तुमच्यासाठी तुमच्या घरात असलेले वास्तूदोष ओळखणे व त्यांचे निवारण करणे खूप आवश्यक होते.आज आम्ही तुम्हाला अशा वास्तूदोषांच्या बाबतीत सांगणार आहोत ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात नेहमीच पैश्यांचा अभाव आणि दुर्भाग्य राहते.

१.ईशान्य दिशेला घाण असणे

खरेतर वास्तूशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही धन आगमनाची दिशा असते. अशात ज्या घरात या दिशेला घाण असेल किंवा निट साफसफाई होत नसेल तर तिथे नेहमीच धनाशी संबंधित त्रास संभवतो. घरात जिथे धनाचे आगमन मंदगतीने होते किंवा आलेला पैसा दीर्घकाळ टिकत नाही किंवा वायफळ खर्च होतो.

२. वायव्य दिशेला अंधार असणे

वास्तूशास्त्रानुसार ईशान्य दिशेप्रमाणेच वायव्य दिशाही आर्थिक संपन्नतेसाठी खूप महत्वाची मानली जाते.अशात या दिशेला जर सतत अंधार असेल तर धनाची हानी होते आणि कौटुंबिक मतभेद राहतात.

३. दक्षिण दिशेला तिजोरी किंवा कपाट असणे

दक्षिणेला कपाट किंवा तिजोरी असणे हा एक मोठा वास्तुदोष आहे.या दिशेला तिजोरी असल्यास धनाची हानी होते. तुमच्या घरात जर असा दोष असेल तर त्यापासून वाचण्यासाठी कपाट किंवा तिजोरीवर एका लाल रीबिनीत तीन नाणी बांधून टांगून ठेवा.

४. ईशान्य दिशेला स्वयंपाकघर असणे.

वास्तूशास्त्रानुसार ज्या घरात ईशान्येला स्वयंपाकघर असते त्या घराची आर्थिक स्थिती नेहमीच कमजोर असते. हेच जर पश्चिम किवा वायव्येला जर स्वयंपाकघर असेल तर घरात आर्थिक संपन्नता राहाते.

५. गृहस्वामीचे घराच्या आग्नेय दिशेस झोपणे

जर घराचा कर्तापुरुष आग्नेय दिशेला झोपत असेल तर घरात त्रास संभवतो.आर्थिक समस्यांपासून ते कौटुंबिक वादापर्यंत अनेक त्रास संभवतात.

तुमच्या घरात या पाचपैकी कोणताही वास्तूदोष असेल तर त्यांचे त्वरित निवारण करा नाहीतर तुम्हाला कायमच दुर्भाग्याचे धनी व्हावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *