झाडे जगवा झाडे वाढवा , पण योग्य पद्धतीने

झाडे ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. आपल्या जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि वाढवली पाहिजेत.

आपण पाहतो कि अनेक झाडे घरांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेली दिसतात. पण खरंच ही सगळी झाडे नीट लावलेली असतात का ?

आपण अनेकदा पाहतो कि मोठ्या मोठ्या इमारती बांधण्यासाठी झाडे तोडली जातात. परिणामी उष्णता वाढते आणि वातावरण बिघडून जाते. मग आता यावर उपाय काय ?

एक असे तंत्र आले आहे कि ज्याद्वारे आपण झाडे योग्य पद्धतीने लावू शकतो. जर का एखादे झाड रस्त्याच्या मध्येच असेल तर त्याला हलवून योग्य ठिकाणी लावू शकतो. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हासही टळेल.

ह्या तंत्रज्ञानानुसार रस्त्याच्या मधेच एखादे झाड लावले असेल तर ते मशीनच्या सहाय्याने योग्य पद्धतीने उचलले जाईल आणि त्या ठिकाणी लावले जाईल जिकडे ते योग्य असेल आणि आड येणार नाही. यांत झाडाच्या दर्जावर आणि आयुष्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. झाडाचे वजन कितीही जास्त असेल तारो ही प्रक्रिया सहजपणे करता येईल. अये केल्याने झाडे एका ओळीत लावलेली छान दिसतील आणि अडचणही होणार नाही.

अधिक माहितीसाठी पहा विडीयो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *