डोक्याला टीळा लावताना का लावतात बरोबर तांदूळ? कारण आहे खूपच खास

हिंदू धर्मात डोक्याला टीळा लावणे खूप महत्वाचे मानले जाते.पूजा , लग्न वगैरे कोणत्याही समारंभात कपाळी टीळा लावला जातो. हिंदू धर्मात याचे विशेष महत्व आहे. शास्त्रात श्वेत चंदन , कुंकू, लाल चंदन,बिल्वपत्र, भस्म इत्यादींनी टीळा लावणे शुभ मानले गेले आहे पण हल्ली जास्तकरून कुंकवाचा टीळा लावला जातो. तुम्ही हेही पहिले असेल कि कुंकवाबरोबर तांदूळही टीळा करताना लावले जातात. पण तुम्हाला त्या मागचे कारण माहिती आहे का ? चला घेऊ जाणून.

शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले गेले तर डोक्यावर जिकडे तुम्ही दोन भुवयांच्या मधोमध टीळा लावता त्याला अग्निचक्र म्हणतात. इथूनच संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार होतो.इकडे टीळा लावल्याने शरीरात उर्जा निर्माण होऊन व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. तांदूळ हे शुद्धतेचे प्रतिक मानले गेले आहे. शास्त्रानुसार तांदूळ हे हवनात देवतांना अर्पण केले जाणारे पवित्र आण आहे. अशात टीळा लावताना तांदुळाचा प्रयोग सकारात्मक उर्जा प्रदान करतो. सनातन धर्मात कुंकवाच्या तील्याबरोबर हळद चंदन भस्मही वापरले जाते. प्रत्येकाचे आपापले लाभ सांगितले गेले आहेत. चला पाहूया हे लाभ

यात एंटी बैक्टीरियल तत्व असतात ज्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. पूजा पाठ करणारे लोक किंवा साधू संत माथ्यावर चंदनाचा टीळा लावतात. यामुळे मानसिक शांती मिळते. माथ्यावर चंदनाचा टीळा लावल्याने मेंदूत सेराटोनिन आणि बीटा एंडोर्फिनचा स्त्राव योग्य पद्धतीने होतो. याने डोके शांत राहते. अशा माणसाचे लक्ष कामात नीट लागते आणि लक्ष्मीची कृपाही त्यावर राहते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंदन टीळा अनेक उग्र ग्रहांची शांती करतो. यामुळे माणसाचे आयुष्य आणखी सुखकारक होते.

काही साधू संन्यासी राखेचा टीळा लावतात काही मंदिरातही भस्माचा टीळा लावला जातो. आध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहायला गेले तर भस्माच्या टीळ्याचे विशेष महत्व आहे. असे म्हणतात कि राखेने अशुद्धपणा साफ होतो व भस्माच्या टीळ्याने माणसाला पापांतून मुक्ती मिळते आणि त्याला अक्षय असे पुण्य लाभते. सेही मानले जाते कि जो माणूस भस्म टीळा लावतो त्याला समाजात मान मरातब मिळतो व लोक त्याला सन्मान देतात.

तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त वाटली असेल आम्हाला जरूर कळवा, आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *