तुमच्याही बोटांवर पडतात का सुरकुत्या ? मग हे जरूर वाचा

आपले शरीर म्हणजे ईश्वराकडून मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. आपले शरीर हे खूप जटील मानले जाते व जे समजून घेण्यास अवघड आहे.आपल्या शरीरात अशा अनेक प्रक्रिया असतात ज्यांची व ज्याच्या कारणांची आपल्याला कल्पनासुद्धा नसते. तुम्ही नेहमी हे पाहिले असेल कि जेव्हा हातापायाच्या बोटांना बराच वेळ पाण्यात ठेवले जाते तेव्हा त्यांच्यावर सुरकुत्या पडतात.

असे का होते ? हा एखादा आजार आहे का कि सामान्य प्रक्रिया ? आधी वैज्ञानिकांचे हे मानणे होते कि बराच वेळ बोटे पाण्यात राहिल्याने त्वचेतून पाणी बाहेर पडू लागते ज्यामुळे त्वचेत शुष्कपणा वाढतो आणि या कारणाने बोटांवर सुरकुत्या पडतात. पण एका शोधानुसार वैज्ञानिकांनी हे सिद्ध करून दाखवले आहे कि असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि जे आतापर्यंत आपण विज्ञानाच्या पुस्तकांत वाचत आलो आहोत ते पूर्णपणे योग्य नाही.

काय आहे वैज्ञानिकांचे म्हणणे

वैज्ञानिक असे सांगतात कि आपल्या शरीरात एक तंत्र काम करते जे बराच वेळ पाण्यात राहिल्याने आतल्या नसांना आवळते आणि या कारणाने आपल्या बोटांवर सुरकुत्या पडतात. ह्या सुरकुत्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर काही काळ राहातात नंतर हळू हळू अपोआप निघून जातात. हे तंत्र आपला श्वास, हृदयाचे ठोके आणि घामाला नियंत्रित करतात. जिवंत राहण्यासाठी ही प्रक्रिया खूप आवश्यक आहे. सुरकुत्या पडण्याचे अनेक फायदेही असतात.

पाण्यात योग्य पकड

एका यूनिवर्सिटीच्या अभ्यासात वालंटियर्सना कोरड्या आणि ओल्या वस्तू धरण्यास सांगितले गेले. या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोट्या ठेवलेल्या होत्या. त्यांना आधी या गोष्टी कोरड्या हातांनी उचलण्यास सांगितले गेले आणि त्यानंतर आपली बोटे पाण्यात अर्धा तास ठेवून मग ह्या वस्तू परत उचलण्यास सांगितले गेले.

यातून असे लक्षात आले कि कोरड्या हातांपेक्षा पाण्यात भिजवलेल्या हातांनी वस्तू उचलण्यास जास्त सोपे जात होते आणि हाताची पकड अधिक घट्ट होती. या अभ्यासाच्या सहलेखिका टॉम स्मलडर यांनी अभ्यास पूर्ण झाल्यावर असेही सांगितले कि आपल्या पूर्वजांना अशा प्रकारच्या सुरकुत्या असलेल्या बोटांनी ओल्या आणि मऊ जागेवर वस्तू नीट उचलण्यास मदत होत असावी. अभ्यास असेही सांगतो कि बोटांच्या या सुरकुत्या कोणतीही वस्तू उचलण्याची क्षमता तर वाढवतेच पण आपल्या हाताची पकड अधिक मजबूत आणि घट्ट बनवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *