तुमच्या पायाचे दुसरे बोट मोठे आहे का ? मग तुम्ही भाग्यवान आहात

साधारणपणे आपल्या पायांची बोटे आणि अंगठे समसमान असतात, पण अनेक लोक असे असतात ज्यांच्या पायांची बोटे वाकडीतिकडी असतात. कधी बोटे पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठी तर तर कधी अंगठा सगळ्यात मोठा असतो. अंगठ्याचा आकार हा तुमच्याबद्दल बरेच काही सांगतो.बोटांचे लहान मोठे असणे यातही काही वेगळा अर्थ लपलेला असतो.जर तुमच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूला असलेली दोन्ही बोटे एकसारखी असतील आणि बाकी बोटे लहान असतील तर तुम्ही खूप कष्टाळू आहात.पण जर तुमच्या पायाचे दुसरे बोट जर सगळ्यात मोठे असेल तर त्याचे महत्व काही वेगळेच आहे.

ज्या स्त्री किंवा पुरुषांचे दुसरे बोट आहे मोठे

शास्त्रांत शरीराच्या सगळ्याच अंगांबाबत काही ना काही लिहिले आहे. त्यांची लक्षणे पाहून व्यक्तिमत्वाबरोबरच त्यांचे भविष्य सांगितले जाते त्याला सामुद्रिक शास्त्र असे म्हटले जाते. सामुद्रिक विद्येच्या अनुसार माणसाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक अवयवाची काही खास लक्षणे मानली जातात.प्रत्येक माणसाच्या अवयवांची बांधणी वेगवेगळी असते आणि त्यांची रचना आकार आणि व्यक्तिमत्वावरून अनेक रहस्ये समजतात. कोणत्याही माणसाच्या पायाची बोटे आणि त्यांचा आकार पाहून हे ओळखले जाऊ शकते कि त्या महिला किंवा पुरुषाचा व्यवहार, आचारविचार आणि कार्य कसे आहे.

ज्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असते.

ज्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असते, त्यानंतरचे बोट थोडे लहान आणि बाकी बोटे अजून लहान असतील तर तो माणूस खूप ताकदवान असतो. हे लोक थोडेसे खट्याळ असतात आणि काही करण्याची इच्छा बाळगून असतात. हे लोक कोणतेही काम संपूर्ण उत्साह आणि उर्जेने करून दाखवतात. हे लोक थोडे वेडे असतात आणि थट्टा मस्करी करण्याचा यांचा अंदाज वेगळाच असतो. ज्यांचे पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट लहान असते ते लोक कायम खुश असतात.याशिवाय ज्यांच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट मोठे असते त्यांचे मानसिक आरोग्य खूप चांगले असते पण शारीरिकदृष्ट्या हे लोक अशक्त असू शकतात.हे लोक कोणतेही काम विचारपूर्वक करतात.

जर पायांच्या अंगठ्याच्या आकाराची दोन्ही बोटे असतील तर

अंगठे आणि त्यांच्या बाजूचे बोट समसमान असेल तर त्याचेही महत्व सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे.जर पायाच्या अंगठ्याबरोबरच बाजूची दोन्ही बोटे समान असतील आणि बाकी बोटे त्यांच्यापेक्षा लहान असतील तर त्याचा अर्थ असा होतो कि तुम्ही समाजात तुमच्या मेहनतीसाठी ओळखले जाता. हे लोक वादविवादापासून स्वतःला दूर ठेवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *