तुम्हाला बोटे मोडण्याची सवय आहे का ? मग हे जरूर वाचा

आपल्यापैकी अनेक लोक असे असतात ज्यांना काही वेगवेगळ्या सवयी असतात. बरेचदा अशा सवयी तुम्हाला खूप महाग पडू शकतात. काही लोकांना दिवसभर सतत बोटे मोडण्याची सवय असते. असे लोक मुद्दाम नाही पण नकळतपणे बोटे मोडत असतात. पण या सवयीचे वाईट परिणाम होऊ शकतात इतके कि तुम्हाला त्याचा पश्चात्ताप करायला लागू शकतो.

काही लोक दिवसातून दोन ते तीन वेळा बोटे मोडतात पण त्याहून जास्त वेळा सातत्याने हे करत राहतात पण त्यांना हे माहित नाही कि ह्याने त्यांचे किती मोठे नुकसान होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत कि त्यानंतर तुम्ही तुमची ही बोटे मोडण्याची सवय सोडून द्याल.

बोटे मोडणे योग्य आहे कि अयोग्य

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बोटे मोडणे चांगलेही नाही व वाईटही. पण ज्यांना हे दिवसातून खुपदा करायची सवय असते त्यांना सांध्यामध्ये वेदनांची समस्या जाणवू शकते. सांध्यांसाठी ते खूप हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला संधीवातासारखे मोठे आजार होऊ शकतात. या आजारात खूप यातना होतात. एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिल्याप्रमाणे ही सवय अनेक सांध्यांशी संबंधित आजारांना आमंत्रण देऊ शकते. आपल्या बोटांची हाडे लीगामेंट ने एकमेकांपासून जोडली गेलेली असतात आणि तुम्ही जर सतत बोटे मोडत राहिलात तर या हाडांमध्ये अंतर निर्माण होते जे खूप घातक आहे.

आपल्या हाताच्या बोटांची हाडे एकमेकांपासून लीगामेंत ने जोडली गेलेली आहेत. आणि जर आपल्याला पुन्हा पुन्हा बोटे मोडण्याची वाईट सवय असेल तर सगळ्या बोटांच्या मध्ये असलेले द्रव्य कमी होऊ लागते. जर हे द्रव्य संपूर्णपणे संपून गेले तर तुम्हाला संधीवातासारख्या आजारांना सामोरे जावे लागेल.

जर एखाद्या माणसाला परत परत बोटे मोडण्याची सवय असेल तर याचा असा अर्थ होतो कि तो त्याच्या हाडांना पुन्हा पुन्हा दुसर्या हाडांनी खेचतो अआहे आणि जर तुमचे जोड हे परत परत खेचले गेले तर तुमच्या हातांची व हाडांची पकड हळू हळू शिथिल होऊ लागते. जर जास्तच झाले तर तुमचे बोट तुतुही शकते.

जर तुम्हाला सतत बोटे मोडायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला संधिवात होऊ शकतो किंवा त्यासारख्या इतर आजारांचा सामना करायला लागू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *