दररोज मुलीसोबत कबरीत झोपतो हा पिता, कारण जाणून घेतल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहाणार नाही

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात बाप होणे हा सगळ्यात सुखाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. एखादी व्यक्ती कितीही धनवान असली किंवा स्वार्थी असली तरी त्याच्या भ्रमाचा भोपळा त्याचे मुल एक ना एक दिवस फोडतेच. खरे तर मुले म्हणजे देवाघरची फुले मानली जातात आणि म्हणूनच त्यांची इच्छा पूर्ण करणे सगळेच आपले कर्तव्य मानतात. बाप आणि मुलीमध्ये अतूट प्रेम आणि विश्वासाचे बंधन असते.

अशातच जर एखाद्या बापाला त्याच्या मुलीच्या मृत्यूबाबत आधीच समजले तर विचार करा त्याची अवस्था काय होईल? कितीही स्वतःला दिलासा दिला तरी आतून बाप कमजोर होत असतो. हल्लीच चीन मध्ये एक किस्सा समोर आला आहे ज्यात एका बापाला हे समजले आहे कि त्याच्या मुलीला एक असा आजार झाला आहे ज्याचा इलाज होऊ शकत नाही आणि ती मुलगी लवकरच बापाचा निरोप घेणार आहे.

एखाद्या माणसाकडे भलेही घर नसेल पण कोणी कधी कबरीत झोपत नाही कबर ही मूत्यूनंतर साठी असते. पण मग असे काय घडले असेल कि त्याला आपल्या मुलीबरोबर कबरीत झोपावे लागत आहे ?

माहितीनुसार चीनमधील लियांग ची एक दोन वर्षांची लहान मुलगी आहे. तिला एक असा आजार झाला आहे ज्याचा काही उपाय नाही, डॉक्टरांनी असे सांगितले आहे कि ती जास्त काळ जगू शकणार नाही. त्यानंतर तो रोज मुलीबरोबर कबरीत झोपतो आणि खेळतोसुद्धा.

असे अनेक आजार असतात ज्याला काहीच इलाज नसतात.तुमच्याजवळ कितीही पैसे असोत,तुम्ही त्यातून वाचू शकत नाही.भारतासारख्या देशात रोज अशा आजारांमुळे शेकडो लोकांचे मृत्यू होतात, चीनसारख्या देशात अशा मृत्यूंची संख्या जास्त आहे.चीनच्या सिचुआन प्रोविंस च्या झांग झिनलेई गावचा शेतकरी लियांग याच्या मुलीला थैलेसिमिया नावाचा जीवघेणा आजार झाला आहे.त्यानंतर तो आपल्या मुलीला कबरीत जिवंत राहायला शिकवत आहे.

आपल्या मुलीच्या आयुष्यातले शेवटचे दिवस तो तिच्याबरोबर कबरीत घालवत आहे. ही हृदयद्रावक घटना सोशल मिडीयावर वायरल होते आहे. सगळेच हे ऐकून हळहळ व्यक्त करत आहेत. तिच्यावर उपाय करणाऱ्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे कि तिच्या रक्तपेशी नीट काम करत नाहीत. डॉक्टर असेही सांगतात कि या परिस्थितीत ही मुलगी जास्तीत जास्त अजून एक वर्ष जगू शकेल, तिचा मृत्यू अटळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *