दहावीत मिळाले होते ८४ टक्के आणि अकरावीत झाली दोनदा नापास , सत्य समोर आल्यावर विद्यार्थिनी झाली थक्क

आजकाल मोदींचा ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ हा नारा जोरात आहे. त्याव्यतिरिक्त काही घटना अशा असतात ज्या ऐकल्या कि असे वाटते कि हा केवळ एक नाराच आहे.शिकायचा अधिकार सगळ्यांना आहे मग तो सामान्य विद्यार्थी असो किंवा दिव्यांग. पण काही लोक असेही असतात जे दिव्यांग व्यक्तींची गणना सामान्य विद्यार्थ्यांमध्ये करत नाहीत.ते त्यांनी सामान्य मुलांपेक्षा वेगळे वाटतात आणि ते त्यांना वेगळेही ठेवतात, मग ते विद्यार्थी कितीही हुशार असोत.आज आम्ही तुम्हाला देहरादूनची एक अशी घटना सांगणार आहोत जिकडे एका दिव्यांग विद्यार्थिनीने आरोप केला आहे कि तिला अकरावीत मुद्दाम दोनदा नापास केले गेले आहे. या गंभीर आरोपानंतर जे सत्य समोर आले ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

या दिव्यांग विद्यार्थिनीचे नाव प्रियांका आहे आणि ती आईटीबीपी केंद्रीय विद्यालयात अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिला दहावीत ८४ % मिळाले होते. म्हणून तिला विश्वास बसला नाही जेव्हा तिला अकरावीत दोनदा नापास केले गेले. ती जेव्हा दुसर्यांदा नापास झाली तेव्हा तिने शाळा प्रबंधकांकडे उत्तरपत्रिका मागितली. आधी शाळा प्रशासनाने उत्तरपत्रिका देण्यास आढेवेढे घेतले मग मात्र तिला तिची उत्तरपत्रिका मिळाली. त्यानंतर जे सत्य समोर आले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली.

तिच्या प्रगतीपुस्तकावर तिचे आई वडील नाही तर दुसर्या कोणाचेच नाव होते. त्यावरची जन्म तारीखही वेगळी होती. तिने मुख्याध्यापकांवर हा आरोप केला कि त्यांनी तिला तिचा मार्ग बदलण्यास सांगितला होता आणि त्यासाठी तिच्यावर दबावही घातला होता. तिने असाही आरोप केला कि पहिल्यांदा अकरावी नापास झाल्यावर तिला कम्पार्टमेंट परीक्षा देऊ दिली नाही आणि दुसर्यांदा तिला चार विषयात नापास केले गेले. त्यानंतर तिने एससी-एसटी आयोगाकडे मदत मागितली. आयोगाने सुनावणीसाठी दोन्ही पक्षांना बोलावले ज्यात मुख्याध्यापिका गैरहजर होत्या, त्यानंतर आयोगाने दुसरी तारीख दिली ज्याची माहिती प्रियांकाला दिली गेली नाही आणि निकाल प्रियांकाच्या विरोधात दिला गेला.

प्रियांका शरीराने ६० टक्के दिव्यांग आहे. तिचे वडील मजूर आहेत. दोनदा नापास झाल्याने तिला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. आता तिला हे समजत नाही कि पुढे काय करायचे, तिला शिक्षण घेऊन नाव मिळवायचे होते पण आता तिला न्याय मिळवायला सगळीकडे भटकावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *