दातात झालेल्या किडीमुळे आहेत त्रस्त तर मग वापरा हा उपाय, दात राहतील कायम मजबूत

दातातली कीड खूप त्रासदायक असते. ही समस्या जास्तकरून लहान मुलांमध्ये दिसून येते कारण ही मुले टॉफी चॉकलेट जास्त खातात पण हल्ली जवळपास सगळ्याच वयोगटात ही समस्या पाहिली जाते. तर चला पाहूया काय आहेत दातात कीड लागण्याची कारणे आणि काय करता येतील त्यावर उपाय. आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा. साधारणपणे दातातले दुखणे लोक सहन करतात पण पण दातात लागलेल्या किडीमुळे हे दुखणे असह्य होते.

अशावेळी काय करावे काही केल्या समजत नाही. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही सोपे उपाय सुचवणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि जर दुखणे उपाय करूनही थांबले नाही तर वैद्यकीय मदत जरूर घ्या. जर वैद्यकीय उपाय टाळायचे असतील तर हे उपाय नक्की करून पहा.

दातात कीड होण्याची कारणे

१. जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातात कीड होते. आणि जर तुम्ही गोड पदार्थ खाल्लेच तर तोंड स्वच्छ धुवावे जेणेकरून दात किडणार नाहीत. २. जेवल्यानंतर दातांची नित सफाई न केल्याने दात किडतात. म्हणून प्रत्येक वेळी जेवण झाल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर दातांची नीट स्वच्छता करावी ३. चिकट वस्तू खाल्ल्याने दात किडतात कारण या गोष्टी दातात अडकून बसतात. असे पदार्थ खाणे टाळा. किंवा खात असाल तर खाऊन झाल्यावर दातांची नित स्वच्छता करा जेणेकरून दातातील चिकटपणा दूर होईल.

किडलेल्या दातांवर उपाय

जर तुमचे दात किडले असतील तर तुमच्या डॉक्टरांना जरूर दाखवा. जर कीड नुकतीच लागली असे तर घरगुती उपाय केल्याने फायदा होऊ शकतो पण जर कीड लागून जास्त दिवस झाले असतील तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. दातातील किडीसाठी एक जालीम उपाय आमच्याकडे आहे. एक चिमुटभर तुरटीच्या पुडीमध्ये एक थेंब लवंगीचे तेल घालून त्याची चांगली पेस्ट बनवा.ही तयार पेस्ट तुमच्या दातांवर लावून नीट चोळून घ्या. असे नियमितपणे केल्याने तुमच्या दातांची समस्या दूर होईल.

कापूर एक उपयुक्त व गुणकारी औषधी आहे. जर तुमच्या दातात कीड झाली असेल आणि दात त्यामुळे दुखत असेल तर हा रामबाण उपाय आहे. कापुराचा चुरा करा व तो दातातल्या फटीत ठेवा किंवा दातांवर धरा, याने दाताचे दुखणे नक्कीच कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *