देशातील मुलींसाठी आदर्श ठरली महिला आयएएस आरती डोगरा

आयएएस आरती डोगरा ने तिह्च्या यशाच्या प्रवासात कधी तिच्या उंचीला अडथळा बनू दिले नाही. राजस्थानात स्वच्छता मॉडल ‘बंको बिकाणो’ पासून ते मुख्यमंत्र्यांना मुग्ध करून टाकणाऱ्या उत्तराखंडच्या कर्नल वडिलांची मुलगी आरती डोग्र ही फक्त राजस्थानच नाही तर संपूर्ण देशाच्या प्रशासनिक वर्गात एक नवीन आदर्श बनली आहे.

आरती डोगरा हिचा राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर अनेक वेळा सत्कार झाला आहे. ती जोधपुरमध्ये डिस्कॉम प्रबंध निदेशकही झाली आहे. या पदावर नियुक्त झालेली ती पहिली महिला आयएएस अधिकारी आहे.राजस्थानच्या बिकानेर आणि बुंदी जिल्ह्यात कलेक्टर झालेली आरती आता अजमेरची नवीन कलेक्टर म्हणून नियुक्त झाली आहे. ती उंचीला फक्त तीन फुट सहा इंच आहे पण तिने उघड्यावर शौच मुक्तीसाठी सुरु केल्या गेलेल्या मॉडल ‘बंको बिकाणो’ने तर पीएमओसुद्धा मुग्ध झाले आहेत.

आरती डोगरा दून च्या के विजय कॉलनी मध्ये राहणारी आहे. तिचे वडील कर्नल राजेन्द्र डोगरा सेनेत अधिकारी आणि आई कुमकुम शाळेत मुख्याध्यापिका आहे.तिच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते कि त्यांची मुलगी सामान्य शाळेत शिकू शकणार नाही.तिच्या आईवडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या आईवडिलांनी पण केला कि ती सामान्य मुलांच्या शाळेतच शिक्षण घेईल आणि त्यांनी ते करूनही दाखवले. त्यांनी तिला पहिल्यापासूनच शिक्षणाव्यतिरिक्त खेळ आणि इतर उपक्रमात भाग घेण्यास प्रेरणा दिली. तिला त्यांनी घोडेस्वारीही शिकवली. आईवडिलांची प्रेरणा तिच्या आयुष्याचा पाया बनली.

शालेय शिक्षण झाल्यावर दिल्लीच्या श्रीराम लेडी कॉलेज मधून अर्थशास्त्राची पदवी घेताना तिने छात्र राजनीतिमध्येही भाग घेतला आणि छात्र संघ निवडणूकही जिंकली. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन ती आपले व्यक्तिमत्व घडवत राहिली. पदवीनंतरचे शिक्षण तिने देहरादूनमधून घेतले. त्यानंतर तिने मुलांच्या शिक्षणाला स्वतःला वाहून घेतले. त्यादरम्यान तिची तत्कालीन कलेक्टर मनीषाशी ओळख झाली आणि तिच्या विचारांना कलाटणीच मिळाली.

मनीषा ने तिला आयएएस च्या तयारीसाठी तयार केले.तिनेही मन लावून तयारी सुरु केली. हे जेव्हा तिच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी असे सांगितले कि कोणतेही काम करताना निकालाची चिंता न करता मन लावून मेहनत घ्या.तिने खूप श्रम घेऊन लेखी परीक्षा पास केली. त्या नंतर प्रात्यक्षिक होते ज्याला सामोरे जाताना ती थोडी निराश होती. इंटरव्यू बोर्डच्या काही महिलांनी तिला दिलासा दिला. प्रश्नोतरांचा तास ४५ मिनिटे चालू राहिला. अशा प्रकारे पहिल्याच प्रयत्नांत आयएएस अधिकारी म्हणून तिची निवड झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *