नदीत तरंगताना दिसली एक पिशवी, उघडून पाहिल्यावर कळले सत्य !

नदीत तरंगताना दिसली एक पिशवी, उघडून पाहिल्यावर कळले सत्य !

 

न्यूज डेस्क:  बर्याचदा नकळत आपण असं काही करून बसतो ज्याने निरागस जीवांची रक्षा घडते. एक असाच आगळावेगळा किस्सा आमच्या समोर आला आहे. मेचाच्युसेट्स च्या अक्सब्रिज मध्ये वाहणाऱ्या ब्लैकस्टोन नदीत दन नावाड्यांना एक थैली तरंगताना दिसली.त्यांनी ही थैली बाहेर काढायचा विचार केला. त्या नावाड्यांना पुसटशीही कल्पना नव्हती की  त्यांच्या या प्रयत्नांमुळे निरागस जीवांचे प्राण वाचत आहेत. सध्या यांच्या शौर्याची चर्चा सोशल मिडीयावर गाजत आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही आपल्याला सांगू की हे दोन्ही नावाडे नदीतून चालले होते , तेव्हा अचानक त्यांच्या दृष्टीस नदीत तरंगणारी एक पिशवी पडली.ते जेव्हा त्या थैलीजवळ पोहोचले तेव्हा तेव्हा त्यातून त्यांना एक वेगळाच  आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून क्षणभर ते घाबरले पण दुसर्याच क्षणी त्यांनी थैलीतले गुपित पाहण्यासाठी म्हणून थैलीजवळ जाणे योग्य समजले. जेव्हा त्यांनी ती पिशवी उघडली तेव्हा आतील दृश्य पाहून आजूबाजूचे लोकसुद्धा पाहात राहिले.आता पाहूया नक्की काय घडले.

हे आपल्याबरोबर अनेक वेळा घडते की आपल्याला प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू दिसतात. असेच काहीसे त्या नावाड्यांच्या बाबतीत घडले. वास्तविक आधी त्यांना ती बटाट्यांनी भरलेली थैली वाटली जी कोणाकडूनतरी चुकून नदीत फेकली गेली असावी व जी  अजूनही तरंगत आहे. पण जेव्हा त्या थैलीतला आवाज वाढत गेला तेव्हा नावाडी थक्क झाले की नक्की थैलीत आहे तरी काय ? आधी त्यांनी या थैलीकडे दुर्लक्ष करायचे ठरवले पण थैलीतून येणाऱ्या आवाजाने त्यांना ती थैली उघडण्यास भाग पाडले.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा त्या नावाड्यांनी ती थैली उघडली तेव्हा आतले दृश्य पाहून त्यांची शुद्धच हरपली. त्या थैलीत कुत्र्याची नवजात पिल्ले होती. पाहून समजतच होते की  त्यांचा नुकताच जन्म झाला आहे कारण त्या पिल्लांचे अजून डोळेही उघडले नव्हते.मिळालेल्या माहितीनुसार ही पिल्ले लैब्राडोर जातीची होती. दिसायला ही पिल्ले इतकी गोंडस होती की कोणालाही आवडतील. कोण जाणे कोणाला ही अशी मस्करी  करावीशी वाटली असेल की ज्याने या पिल्लांना पिशवीत बांधून नदीत सोडून दिले असेल.पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी !! असेच काही त्या पिल्लांबद्दल घडले म्हणूनच कदाचित मरता मरताही त्यांच्यावर नावाड्यांची नजर पडली व त्यांचे प्राण वाचले.

या घटनेनंतर नावचालकांनी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली ज्यानंतर पोलिसांनी पिल्लांना मुक्त केले.सध्या पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात खटला केला आहे ज्यांना या निरागस जीवांची जराही दया आली नाही व त्यांना मरण्यासाठी नदीत बांधून सोडून दिले.पशु कायद्यानुसार ज्याने हे लज्जास्पद कृत्य केले आहे त्याला जवळपास तीन लाख पंचवीस हजार इतका दंड भरावा लागेल.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *