नियमित शारीरिक संबंध ठेवल्याने होणारे फायदे पाहून हैराणच व्हाल.

रोज व्यायाम करण्याप्रमाणेच शरीरसंबंधसुद्धा माणसाच्या आरोग्यासाठी एक आवश्यक गोष्ट आहे. तसे पाहायला गेले तर आपल्या भारतीय संस्कृतीत याबाबतीत मोकळेपणाने बोलले जात नाही. या विषयाच्या बाबतीत आजही लोक मोकळेपणे बोलायला संकोच करतात.खरे सांगायचे तर शरीरसंबंध ठेवणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. जसे चांगल्या आरोग्यासाठी चांगले जेवण आणि शांत झोप आवश्यक आहे तसेच संबंध ठेवणेसुद्धा माणसाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते.

तसे नेहमी पाहिले जाते की व्यस्त जीवनामुळे पती पत्नी अनेक दिवस एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत ज्यामुळे त्या दोघांच्या शरीरात अनेक नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. आता पाहूया संबंधांनी होणार्या फायद्यांबाबत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

अनेक संशोधनांतून हे सिद्ध झाले आहे की शरीरसंबंध ठेवल्याने माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जे लोक नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात त्यांची शारीरिक ताकत पण चांगली असते.

हृदयविकाराचा धोका कमी होतो.

जे स्त्री पुरुष नियमित संबंध ठेवतात त्यांना हृदयविकारासारखे आजार होण्याचा धोका खूप कमी असतो. असे केल्याने त्यांचे हार्मोन व स्नायू व्यवस्थित राहातात.

तणाव कमी होतो

जे लोक नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात त्यांचे डोके शांत राहते. याउलट जे लोक नियमितपणे संबंध ठेवत नाहीत त्यांच्यात मानसिक तणाव फार जास्त असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *