नीता अंबानीने खरेदी केली आहे नवीन कार, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबाचे नाव सगळ्यात आधी घेतले जाते.अंबानी परिवार एक असा परिवार आहे ज्याला देशातील सगळेच लोक ओळखतात. या कुटुंबाशी संबंधित कोणतीही गोष्ट चर्चेत राहाते. मुकेश अंबानी यांची पत्नी जी रिलायन्स कॉरपोरेट बरोबर मुंबई ईंडीयंसच्या टीमला सांभाळते. तिच्या लहानात लहान बाबीचीही बातमी होते आणि सगळीकडे पसरते.सध्या चर्चेत आहे ती तिने नुकतीच घेतलेली कार.

राजेशाही थाटात आयुष्य जगणारी नीता अंबानी एकेकाळी मध्यमवर्गाशी संबंधित होती. लग्नानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि आज ती फक्त ब्रांडेड गोष्टीच वापरते.तिने हल्लीच एक नवीन कार घेतली आहे जी स्पेशल एडिशन ऑडी ए नाईन शामेलीयान आहे आणि या स्पेशल एडिशनची फक्त काहीच मॉडेल बाजारात आली आहेत.

ही कार सध्या भारतात उपलब्ध नाही. तिला यू एस ए मधून इम्पोर्ट केले गेले आहे आणि म्हणून तिची किंमत आणखी जास्त आहे. माहितीनुसार या कारची किंमत जवळपास १०० करोड रुपये इतकी आहे आणि नीताने ही कार फक्त तिच्या ऑफीस मध्ये जाण्यायेण्यासाठी घेतली आहे. अंबानी कुटुंबाच्या एका चालकाने असेही सांगितले कि नीताला वेगवेगळ्या कार जमवायची खूप आवड आहे आणि ती एकापेक्षा एक महाग गाड्या फक्त हौस म्हणून खरेदी करते. आणि तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. यात सगळ्यात महाग गाडीही आहे.असे म्हणतात कि अंबानी यांच्या घरात जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या कदाचित एखाद्या शोरूममध्येही नसतील.

१९६३ साली एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या नीताला नृत्यांगना व्हायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आता ती एक यशस्वी उद्योगिका आहे आणि अनेक एनजीओ चालवते. तिच्याकडे जगातील उत्तमोत्तम ब्रांडच्या वस्तू आहेत ज्या ती वापरते. तिचे कपडे मोबाईल. चपला अशा गोष्टी कायमच चर्चेत असतात. तिच्याकडे जी पर्स आहे तिची किंमत जवळपास पाच लाख इतकी आहे.तिच्याकडे अनेक उत्तम ब्रांडची घड्याळे आहेत ज्याची किंमत अडीच लाखापासून सुरु होते.

तिच्याकडे अनेक साड्या अशा आहेत ज्या हिरेजडीत आहेत.तिच्याकडचे दागिने लाखो रुपये किमतीचे आहेत.इतकी श्रीमंत असूनही तिचे पाय आज जमिनीवर आहेत आणि ती अनेक गरीब मुलांना मदत करते आणि त्यांचे शिक्षण करायला आर्थिक मदत देते. तिने तिच्या मुलांना साधेपणाने वाढवले आहे आज तीच मुले रिलायन्स उद्योगाचा कारभार सांभाळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *