पहा कसे असतात ‘A’ अक्षराचे लोक, तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव ‘A’ वरून सुरु होत असेल तर हे जरूर वाचा.

A अक्षराचे लोक

ज्योतिषशास्त्रानुसार नावाच्या पहिल्या अक्षराने खूप फरक पडतो.होय, नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्ही हे जाणून घेऊ शकता कि समोरचा माणूस कसा आहे किंवा त्याचा व्यवहार कसा आहे.तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कि प्रत्येक माणसाचा व्यवहार हा वेगवेगळा असतो पण नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुम्ही ओळखू शकता कि ती व्यक्ती कशी असेल.

आज आम्ही तुम्हाला A अक्षराने नाव सुरु होणार्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.जर तुमचे नाव A वरून सुरु होते किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव A पासून सुरु होते तर त्याच्या बाबतीत आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत.ज्योतिषशास्त्रानुसार यांचा एक अंक असतो ज्यामुळे हे लोक खूप बुद्धिमान असतात.

A अक्षराने नाव सुरु होणार्यांचा व्यवहार

चला तर पाहूया या अक्षराने नाव सुरु होणार्या लोकांबद्दल. कसे असतात हे लोक, कसा असतो यांचा स्वभाव आणि एकंदरीत यांचे वर्णन घेऊया जाणून.

१. रागीट स्वभाव

या लोकांचा स्वभाव जरा रागीट असतो पण यांचे मन साफ असते. यांना लहान सहान गोष्टीत खूप राग येतो. कधीकधी रागात हे आपले सर्वस्व हरवून बसतात. यांचा राग जसा येतो तसच पटकन निघूनही जातो.

२. कमी रोमांटिक

यांचे प्रेमाचे जीवन तसे तर खूप चांगले असते पण हे लोक कमी रोमांटिक असतात. हे लोक प्रेमतर करतात आणि आपल्या व्यक्तीला खुश ठेवायचा संपूर्ण प्रयत्न करतात पण त्यांना त्याचा प्रचार करायला आवडत नाही.

३.बुद्धिमान

या अक्षराने नाव सुरु होणारे लोक खूप बुद्धिवान असतात. म्हणूनच त्यांना प्रत्येकच क्षेत्रात यश मिळते. यांना पराजय आवडत नाही. बुद्धीच्या जोरावर हे लोक खूप प्रगती करतात.

४. हट्टी
हे लोक स्वभावाने हट्टी असतात. आपली गोष्ट मनवून घेणे यांना जमते.हे लोक जर हट्टाला पेटले तर कोणाचेच ऐकत नाहीत. माझेच खरे असे यांचे बरेचदा असते.यांना दुसर्या व्यक्तीची गोष्ट पटवून घेणे जड जाते. ही लोक खूप आत्मकेंद्रित असतात असेही म्हणता येईल.

५. रोक टोक आवडत नाहीत

हे लोक मोकळ्या विचारांचे असतात आणि यांना कुठल्या गोष्टीत आडकाठी केलेली आवडत नाही. तसे केल्यास त्यांचा मूड लगेच जातो.सबुरी यांना आवडत नाही.कोणतीही गोष्ट लगेचच यांना हवी असते. थांबणे यांना माहीतच नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *