बघा तुमचे भाग्य कसे उजळवते एक चिमुटभर मीठ !!

मीठ हे फक्त खाण्यासाठीच उपयोगाचे नसते तर त्याशिवायही त्याचे अनेक फायदे आहेत जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.तुम्हाला हे माहिती आहे का कि मिठाचा उपयोग घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठीही होतो? ज्योतीशींचे ऐकाल तर मिठाचा उपयोग केल्याने माणसाच्या आयुष्यात मानसिक शांती राहाते आणि घरात सुख समृद्धी टिकते. मीठ आरोग्य राखायला मदत करते.वास्तृशास्त्रानुसार मिठाचा योग्य उपयोग माणसाचे भाग्य उजळवून टाकते.म्हणूनच जाणून घ्या कि कशा पद्धतीने मिठाचा वापर करायचा आहे.

पहा कोणते आहे मिठाचे फायदे

जर तुमच्या घरात रोजच कोणीतरी आजारी पडत असेल किवा घरात कलह होत असतील तर तुम्ही खडेमिठाच्या पाण्याने घरात पोता करा. फक्त पोता करायच्या पाण्यात जर तुम्ही एक चिमुटभर मीठ घातले तर काही दिवसातच तुम्हाला त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. शक्य असल्यास रोजच नाहीतर प्रत्येक मंगळवारी काळ्या मिठाने पोता करावा. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जा बाहेर जाईल आणि सकारात्मक उर्जा घरात येईल. घरात कोणाला आजार होणार नाहीत आणि कलह कमी होतील.

मीठ नेहमीच काचेच्या भांड्यात ठेवा

मीठ हे नेहमीच काचेच्या भांड्यात ठेवावे, स्टील किंवा इतर धातूच्या भांड्यात ठेवू नये.वास्तुशास्त्र असे सांगते कि एक लवंग आणि मीठ काचेच्या बरणीत जर ठेवले तर कमाल होईल. याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि पैशाची चणचण कधीही भासणार नाही.

मानसिक शांती पण राखते मीठ

खूप प्रयत्न केल्यानंतरही जर तुमचे मन बेचैन राहात असेल किंवा कुठेही तुमचे मन लागत नसेल तर अशात आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर मीठ घालावे आणि त्या पाण्याने आंघोळ करावी. वास्तूशास्त्रज्ञ असे सांगतात कि असे केल्याने मानसिक शांती लाभते आणि मन बेचैन राहणार नाही. तुम्हाला कायमच ताजेतवाने वाटत राहील, शरीरात स्फूर्ती निर्माण होईल आणि आळसातून सुटका होईल.

मिठाशी संबंधित या गोष्टीची काळजी नक्की घ्या

जुना समाज असा आहे कि जर तुम्ही मीठ सरळ कोणाच्या हातावर ठेवाल तर त्याचे आणि तुमचे भांडण होण्याची दाट शक्यता असते.म्हणून नेहमीच मीठ चमच्याने द्यावे,सरळ हातात देऊ नये.याशिवाय हेही लक्षात ठेवा मीठ कधीही जमिनीवर सांडू नये, किंवा फुकटही घालवू नये.मीठ फुकट घालवणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *