ह्या मराठी अभिनेत्रीसोबत लग्न करणार होता सुनील शेट्टी, परंतु ‘ह्या’ कारणामुळे नाही झाले लग्न…

‘आण्णा’ या नावाने प्रसिद्ध असलेला सुनील शेट्टी हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. पण तो सध्या चित्रसृष्टीपासून स्वतःला दूर ठेवताना दिसतो. काही निवडक चित्रपटांतच तो काम करत आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने उतामोत्तम भूमिका वठवल्या आहेत. बहुतकरून त्याने एक्शन हिरोचीच कामे केली आहेत. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या बलवान या चित्रपटातून त्याने त्याच्या कारकीर्दीस सुरुवात केली.

तुहाला हे माहिती आहे का कि एका मराठी अभिनेत्रीबरोबर त्याचे सुत जुळले होते? होय, हे खरे आहे. पाहूया कोण होती ती अभिनेत्री जी सुनीलच्या हृदयावर राज्य करून बसली. सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांचे सुत जुळले होते. टक्कर, सपूत, कहर अशा अनेक चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले आहेत.या दोघांची जोडी फार गाजली.या चित्रपटांच्या शुटींगदरम्यान बराच काळ त्या दोघांना एकमेकांसोबत घालवायला मिळाला आणि त्या दोघांचे प्रेम जमले. आश्चर्याची गोष्ट अशी कि सुनीलचे लग्न झालेले असूनही तो सोनालीच्या प्रेमात पडला आहे.

अक्शन हिरो म्हणून सुनीलने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली.चित्रपट करण्याआधी तो किक बॉक्सिंग चा एक उत्तम खेळाडू होता आणि त्यामुळेच त्याला अनेक चांगले अक्शन सिनेमे मिळत गेले. १९९७ मध्ये आलेल्या भाई या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ते दोघे एकमेकांच्या आणखी जास्त जवळ आले. पण जाहले असे कि त्याने स्वतःचे प्रेम कधी सोनालीजवळ व्यक्त केले नाही. याचे कारण असे कि त्याचे आधीच लग्न झालेले होते आननी त्याला आपल्या बायकोला दुखवायचे नव्हते.

त्याचा विवाह १९९१ साली माना शेट्टी हिच्याशी झाला होता. त्यांचे वैवाहिक जीवनही उत्तम आहे. माना प्रसिद्धीझोतापासून स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *