इंडियन आर्मी इतर महागड्या गाड्या नं वापरता, “जिप्सी”च का वापरतं? वाचा त्यामागचं कारण

तंत्राच्या या युगात प्रत्येकालाच असे वाटते कि त्याच्याकडे वेगवेगळ्या सुविधांनी भरलेली उपकरणे असावीत पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का कि भारतीय सेनेत आजच्या बदलत्या काळातही मारुती जिप्सीचाच वापर का होतो ? वेगवेगळ्या नवीन कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्या असतानाही दुसर्या कोणत्या गाडीचा विचार का केला जात नाही. चला जाणून घेऊ काय आहे ते कारण.

१५ ते २० वर्षांपूर्वी अजूनही कंपन्या भारतात अशा होत्या ज्या गाड्या बनवत होत्या. पण अशा दोन तीनच होत्या. पण आताचा कालच निराळा आहे. आज जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या भारताच्या लोकांसाठ वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बनवतात आणि विकतात. मग काय कारण आहे कि भारतीय सेनेत १९८५ पासून आजतागायत फक्त जिप्सीच वापरली जात आहे? चला शोधून काढूया याचे कारण. वास्तविक आजच्या या युगात मारुती जीप्सीची तुलना वर्तमानातील ‘एसयूवी’ बरोबर केली जाते. अनेक देशांत सेनेकडे जास्तकरून या प्रकारच्या गाड्या असतात. पण या गाड्या अजिबात हलक्या नसतात आणि युद्धाच्या क्षेत्रात एक चांगली गाडी म्हणून ती नक्कीच सिध्द होऊ शकत नाही.

जीप्सिकडे ती क्षमता आहे जो कोणत्याही दुर्गम भागात जाऊन तिचे चांगले प्रदर्शन करू शकेल. ही परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलवू शकते. या गाडीला आत्म एकदम मजबूत बनवले गेले आहे आणि हेच कारण आहे कि भारतीय सेनेची पहिली पसंती ही गाडी आहे. यात अनावश्यक उपकरणांचा भरणा नाही. याच्या आत चार सिलेंडरचे इंजिन बसवले गेले आहे ज्याची क्षमता 80बीएचपी (हॉर्स पॉवर) इतकी आहे.

सुरुवातीपासूनच सेना या गाडीचा वापर रस्तांपासून टेकडी आणि डोंगरांपर्यंत एक अनेक हेतू साध्य करणारे वाहन म्हणून वापर करत आली आहे. याच्यात मिलिटरीच्या उपकरणांना घेऊन जाण्याची संपूर्ण क्षमता आहे. असे नाही कि ही गाडी बदलण्याबद्दल काहीच विचार केला गेला नाही. मध्ये अशी बातमी आली होती कि देणा मारुती जिप्सीच्या जागी महिंद्रा स्कॉर्पियो व टाटा सफारी वापर करण्यास देणार आहे पण तसे झाले नाही, ही योजना अमलात आणली गेली नाही. आजच्या घडीला तसे तर बाजारात खूपच चांगली वैशिष्टे असलेल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या गाड्या आहेत व त्या पाहूनही हा बदल करण्याचा विचार निश्चितपणे केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *