तब्बल ३० वर्षे अकबराला झुंझवणाऱ्या ‘महाराणा प्रताप’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी !

महाराणा प्रताप हे मेवाडचे महान हिंदू शासक होते. सोळाव्या शतकातील राजपूत शासकांत महाराणा प्रताप हे एक असे शासक होते कि जे अकबराला सतत ३० वर्षे टक्कर देत राहिले. चला पाहूया त्यांच्याशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी.

१. हल्दीघाटीचे युद्ध मुगल बादशाह आणि महाराणा प्रताप यांच्यात १८ जून १७५६ मध्ये लढले गेले. हे झालेले युद्ध महाभारताप्रमाणेच विनाशकारी सिद्ध झाले. असे म्हणतात कि हल्दीघाटी च्या युद्धात अकबरही जिंकू शकला नाही किंवा राणाही हरले नाहीत. मुगालांजवळ सैन्य शक्ती खूप होती तर राणा प्रतापकडे झुंजारु शक्तीची काहीच कमतरता नव्हती. २. महाराणा प्रतापचा भाला ८१ किलो वजनाचा होता आणि त्याच्या छातीचे कवच ७२ किलोचे होते. त्याचा भाला कवच ढाल आणि बरोबर दोन तलवारींचे वजन मिळून २०८ किलो होते.

हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रतापना विजेता घोषित करण्याची तयारी

३. तुम्हाला हे सांगतो आहोत कि हल्दी घाटीच्या युद्धात महाराणा प्रतापच्या जवळ फक्त २०००० सैनिक होते आणि अकबर कडे ८५००० सैनिक. असे असूनही महाराणा प्रतापने हार मानली नाही आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत राहिले.  ४. असे म्हणतात कि अकबरने महाराणा प्रतापला समजवण्यासाठी सहा शांतीदूत पाठवले होते ज्यामुळे शांतीपूर्ण पद्धतीने युद्ध संपवता येईल, पण महाराणा प्रतापनी हे सांगून प्रत्येकवेळी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला कि राजपूत सैनिक प्रत्येक वेळी हे सहन करू शकणार नाहीत. ५. हल्दी घाटातील युध्दावेळी महाराणा प्रताप यांनी बहलोल खानवर असा वार केला की त्यांच्या शरीराचे तसेच घोड्याचे देखील दोन तुकडे झाले.

६. महाराणा प्रतापने त्याच्या आयुष्यात एकूण ११ लग्ने केली. असे म्हणतात कि हे सगळे विवाह राजनैतिक कारणाने केले गेले. ७. महाराणा प्रतापला लहानपणी किका म्हणायचे. ८. महाराणा प्रतापचा सगळ्यात प्रिय घोडा चेतक होता. प्रताप प्रमाणेच त्यांच्या घोडा चेतकही खूप शूर होता. हा घोडा फारच प्रसिद्ध झाला. ९. असे म्हणतात कि जेव्हा युद्ध चालू असताना मुगल सेना त्यांच्या मागे पडली होती तेव्हा चेतकने महाराणा प्रतापला आपल्या पाठीवर बसवून काही फुट दूर नाला पार केला होता. आजही चितोडगडच्या हल्दी घाटात चेतकची समाधी आहे.

१०. हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रताप च्या बाजूने लढणारा फक्त एक मुस्लीम सरदार होता , आणि तो म्हणजे हकीम खान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *