माणसाच्या उंचीप्रमाणे त्याचे वजन किती असायला हवे, चला पाहूया

माणसाचे वजन हा एक महत्वाचा घटक आहे. माणसाचे वजन किती असायला हवे हे त्याच्या उंची व वयाप्रमाणे ठरते.

माणसाचे वजन हे योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. जर वजन प्रमाणाबाहेर असेल तर अनेक रोगांना सामोरे जायला लागू शकते. आजकालचे योग हे धावपळीचे आहे. आणि आपल्या धावपळीत आपण आपल्या आहाराकडे आणि वजनाकडे लक्ष देऊ शकत नाही. याचा परिणाम म्हणून वजन खूप वाढते आणि आपल्याला अनेक आजार होतात.आज आपण या लेखात पाहूया कि आपल्या उंचीनुसार आपले योग्य वजन किती असायला हवे ते.

फक्त उंची नाही तर अनेक घटक यात महत्वाचे असतात. तुमचे वय लिंग उंची आणि हाडांची घनता हे घटक खूप महत्वपूर्ण असतात. वजन आणि उंचीच्या चार्ट वरून तुम्ही पाहू शकता कि तुमचे योग्य वजन उंचीप्रमाणे किती असायला हवे ते. जर चार्टप्रमाणे तुमचे वजन जास्त आले तर तुम्ही ओवरवेट प्रकारात मोडता आणि जर तुमचे वजन कमी भरले तर तुम्ही अंडरवेट प्रकारात मोडता.

चला पाहूया जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतो ते

मधुमेह

जर तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह होऊ शकतो. कारण तुमच्या आहारात ग्लुकोसचे प्रमाण जास्त असेल तर तुमचे वजन खूप जास्त वाढते आणि यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता असते.

सांधेदुखी

ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना सांधेदुखीचा खूप त्रास होतो. उठता बसताना अशा लोकांना खूप सांधे दुखत राहातात. त्यांच्या सांध्यांवर अतिरिक्त दबाव येतो आणि त्यांना खूप जास्त वेदना होतात. शरीरातील कार्तीलेज ची मात्र कमी झाल्याने अर्थ्रायटीज चा धोका संभवतो.

यामुळेच तुमचे वजन नेहमी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वय लिंग उंची याच्या प्रमाणात तुमचे वजन राखायचा नेहमीच प्रयत्न करा आणि आजारांपासून दूर राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *