मुलींना आवडते आपल्यापेक्षा लहान मुलांशी लग्न करायला, घ्या कारणे जाणून

आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह संबंधांचे काही नियम आखून दिले गेले आहेत जेणेकरून वैवाहिक जीवन सुखाचे आणि समाधानाचे होईल.यातलाच एक महत्वाचा नियम असा आहे कि लग्नासाठी मुलाचे वय हे मुलीपेक्षा जास्त असावे. पण बदलत्या काळाबरोबरच परंपरेत आणि मानसिकतेत बदल होताना दिसतो. आज अनेक विवाह असे होताना दिसतात ज्यात मुलाचे वय मुलीच्या वयापेक्षा कमी आहे. अनेक मुली आनंदाने आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलाशी लग्न करायला तयार असतात. काय कारण असेल ज्याने मुलींना आपल्यापेक्षा लहान मुलाशी लग्न करायला आवडते ? चला पाहू.

ज्या मुली आपल्या व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी आहेत त्या खासकरून आपल्यापेक्षा लहान मुलाशी लग्न करण्यास उत्सुक असतात. अभिनेत्री नेहा धुपिया ही सुद्धा त्यातलीच एक आहे.तिने आपल्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या अंगद बेदीशी लग्न केले आहे. त्यांचे लग्न सर्व विधींसह दिल्ली येथे पार पडले आहे.ही माहिती स्वतः नेहाने ट्विटरवर शेयर केली आहे.अशी लग्ने झाल्यावर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो कि मुली असा निर्णय का करतात.अशा लग्नाच्या बाबतीत यशस्वीतेचाही संशय असतो. खरेतर असे लग्न केल्याचे अनेक फायदे आहेत.

कमी वयात मुले जास्त सक्रीय आणि खिलाडू वृत्तीचे असतात. त्यांना नवीन गोष्टी शोधायला व शिकायला आवडतात. त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला नेहमीच तरुण असल्याचे वाटते आणि आपल्या वयाचा विसर पडतो.जेव्हा एखादी मुलगी एखाद्या लहान मुलाची निवड जोडीदार म्हणून करते तेव्हा हे जाहीरच आहे कि तिला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आणि अनुभव जास्त असेल.इतकेच नाही तर ती करियरमध्येही सेटल झालेली असेल.अशी मुलगी भावनात्मकरित्या मजबूत असते. अशा मुली आपल्या जोडीदारावर अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जेव्हा मुलगी मुलापेक्षा लहान असते तेव्हा ती प्रत्येक बाबतीत आपल्या नवर्यावर अवलंबून असते.

आपल्यापेक्षा मुलगा जव्हा लहान असतो तेव्हा तो आपल्या शारीरिक गरजा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो.अशा वेळी तुमच्यात शारीरिक आकर्षण जास्त असते. पार्टनर वयाने लहान असेल तर त्याची आधी काही प्रकारणे नसतात. किवा त्याबाबतीत असुरक्षित वाटण्याची काही गरज नसते. लान मुलात खूप उत्साह आणि उर्जा असते त्यामुळे तुमच्यात संबंध चांगल्या पद्धतीने राहू शकतात. वयाने मुलगा लहान असल्यास तुमच्या नात्यात कुठेही अहंकार नसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *