याला म्हणतात भाग्य ! खपरैलच्या एका मुलीची पाठवणी झाली हेलिकॉप्टर मधून

असे म्हणतात कि नशिबात असेल तर ते त्याला मिळतेच. ज्याला नशिबाची साथ असते त्याचे भाग्य उजळतेच. अशा व्यक्तीला वाईटात वाईट काळातही त्रास होत नाही. काही लोकांचे हे आधीच ठरलेले असते कि त्यांना आयुष्यात काय करायचे आहे. नशीब चांगले असेल तर तेही मिळते ज्याचा माणसाने कधी विचारही केला नसेल. आटतच एक घटना अशी समोर आली आहे कि जी पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

आई वडील म्हणतात खरेच आमची मुलगी आहे खूपच नशीबवान

इंदोर जवळच्या जावरा भागातील पठाणटोळी परिसरात एका चादरीने झाकलेल्या खोलीत राहणाऱ्या शाहिस्ताच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. जी एका लहानश्या झोपडीत राहत होती ती अचानक मंगळवारी हेलिकॉप्टरमध्ये बसून सासरी रवाना झाली. तिची पाठवणी करताना फळे विकणारे वडील आणि शिवणकाम करणारी आई यांचे डोळे पाणावले. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात असू अशी तिची पाठवणी त्यांनी केली. त्यांना आपल्या मुलीचा खरोखरच अभिमान वाटला.

तीन वर्षांपूर्वी झाला होता साखरपुडा

मैट्रिक पास शाहिस्ताचे असे म्हणणे आहे कि माझ्याशी लग्न करायला कोणी हेलिकॉप्टरमध्ये बसून येईल, जे फक्त परीकथेत होते ते आज सत्यात उतरले आहे. पठाणटोळीच्या वाहिद खानची मुलगी शाहिसता हिचा साखरपुडा तीन वर्षांपूर्वी राजस्थानमधील खनिज व्यापारी आरिफ खानचा मुलगा हाजी असिफ खान याच्याशी झाला होता. सोमवारी असिफ रतलाम ला हेलिकॉप्टर मध्ये बसून तिला घ्यायला निघाला.

पहिल्या नजरेत केले होते पसंत

असिफ ने शाहिस्ताला पहिल्याच नजरेत पसंत केले होते. शाहिस्ता ची आई असिफ बी असे सांगते कि तीन वर्षांपूर्वी ती तच्या बहिणीला भेटायला मुगलपुरा ला गेली व तिकडे असिफ ने तिला पाहिले, इतकी सुंदर मुलगी मला आधी का नाही दिसली असे तिला वाटून गेले. मग तिने आरिफ खानशी त्याच्या मुलाशी लग्नाबाबत बोलणी केली. मग असिफ तिला पाहायला आला आणि पहिल्या नजरेत पसंत केले, त्यांने आतापर्यंत पन्नास मुली पाहिल्या होत्या.

श्रीमंती गरिबी महत्वाची नाही, मुलगी आम्हाला पसंत आहे

श्रीमंती गरिबी महत्वाची नाही, मुलगी आम्हाला पसंत आहे असे असिफ म्हणाला.असिफ चा भाऊ आदिल खान याचा विवाह सुद्धा त्याच दिवशी जुलाह्पुरा मधील एका शेतकऱ्याच्या मुलीशी झाला आणि दोघे भाऊ लग्न करून आपापल्या बायकांना हेलिकॉप्टर मधून घेऊन गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *