या अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या महिला असतात स्वच्छ मनाच्या, सगळ्यांचे मन जिंकून घेतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या नावाचे व अक्षराचे खूप महत्व असते. नावाचे पहिले अक्षर त्या व्यक्तीच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकते. या अक्षरावरून बर्याच गोष्टी ओळखल्या जाऊ शकतात. माणसाचा स्वभाव व वैशिष्ट्य ओळखली जाऊ शकतात. कोणीही परिपूर्ण नसते आपल्या सगळ्यांच्यातच काही चांगले व वाईट गुण, चांगल्या व वाईट सवयी या असतातच. पण बरेचदा एखाद्या माणसाला दुसर्याच्या स्वभावाचा वागण्याचा किंवा सवयीचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही नात्यात एकमेकांचे चांगले वाईट गुण स्वीकारणे सगळ्यात जास्त महत्वाचे असते.

आज आम्ही तुम्हाला त्या स्त्रियांबाबत सांगणार आहोत ज्यांचे नाव P आणि R वरून सुरु होते. तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव P किंवा R वरून सुरु होत असेल तर तुम्हाला त्याच्या व त्याच्या भविष्याबाबत खूप गोष्टी इकडे जाणून घेता येतील.

R नावाच्या स्त्रियांचा स्वभाव

या महिला एक तर एकदम बडबड्या असतात किंवा एक तर एकदम शांत तरी असतात. शांत बसणाऱ्या स्त्रियांना अवांतर गप्पांपेक्षा कामाचे बोलणे अधिक जास्त आवडते. बडबड्या ज्या बायका असतात त्यांचा कधीतरी इतरांना त्रास होतो. या नेहमी काही नवीन शोधात राहतात. यांची प्रगती खूप वेगाने होत असते. या महिला त्यांची सगळी कामे खूप मन लावून करतात आणि तडीस नेतात. या समाजात मिळून मिसळून वावरतात आणि याचा परिणाम कधीकधी त्यांच्या वैवाहिक जीवनावरही होतो. यांचा स्वभाव फार सरळमार्गी असतो. यांना शांत राहणे आवडते आणि म्हणून या जास्त कुठे मिसळत नाहीत. मोजक्या लोकांशी यांचा संपर्क असतो. यांना वायफळ बडबड आवडत नाही.

P नावाच्या स्त्रियांचा स्वभाव

यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर व्यवहारज्ञान ही असते.या बायका खूप कष्टाळू असतात. या कशालाही न घाबरता त्यांचे काम पूर्ण करतात. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते.लोकांशी पटकन मैत्री करण्याचा जुळवून घेण्याचा यांचा स्वभाव असतो.सत्याची कास धरणे यांना खूप आवडते.या महिला शीघ्रकोपी असतात यांना राग पटकन येतो आणि याने माणसे दुरावली जातात, यांचा राग लवकर शांतही होतो. या स्त्रिया फार तत्वनिष्ठ असतात आणि त्या कधीही तत्वांशी तडजोड करायला तयार होत नाहीत. या कधीही खोटे बोलत नाहीत आणि खोटे बोलणारी माणसे यांना अजिबात आवडत नाहीत.

ही माहिती आवडल्यास जरुर शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *