कोणाचेही आयुष्य हे सोपे नसते. सुख जसे मिळतात तशीच आयुष्यात दुख्खही येतात. जर देवाने माणसाला फक्त सुख दिले असते तर माणूस देवालाही विसरून गेला असता आणि स्वार्थी बनला असता, म्हणूनच आयुष्यात दुख्खांना महत्व आहे. माणूस या आशेवर असतो कि दुखानंतर सुख हे येतेच. देवाने म्हणूनच माणसाला दुख्खे दिली जेणेकरून देवाचे स्मरण माणूस आयुष्यभर आगी अंतिम क्षणापर्यंत करेल. संकटे आल्यावर अनेक माणसे डगमगून जातात आणि असा विचार करतात कि जर मला या संकटाची आधीच कल्पना असती तर बरे झाले असते.
वाईट काळानंतर चांगला काळ हा येतोच. वाईट काळ येण्याआधी माणसाला काही संकेत मिळतात अन बरेचदा ते त्याला समजत नाहीत. जर हे संकेत तुम्ही नीट समजून घेतलेत तर संकटे टाळता येतील. चला जाणून घेऊ या संकेतांविषयी.
1) माणसांप्रमाणेच झाडांतही प्राण असतात. झाड किंवा रोपांना संकटांची चाहूल ही आधीच लागते. जर घरात तुळशीचे रोप असेल तर ते सुकून जाईल जर संकट जवळ आले असेल तर. 2) आजार हे ही एखाद्या संकटांचे संकेत देतात. जात घरात कोणी आजारी असेल आणि त्याचा आजार खूप इलाज करूनही बरा होत नसेल तर समजून जा कि संकट येणार आहे. 3) घरात आनंद येण्यासाठी लक्ष्मीचे प्रसन्न होणे महत्वाचे आहे व यासाठी घरात साफ सफाई ठेवणे गरजेचे आहे. जर खूप सफाई करूनही घरात घाण राहत असेल तर समजून जा कि लक्ष्मी देवी नाराज आहे आणि लवकरच तुमच्यावर संकट येणार आहे. 4) नेहमी मुंग्या किंवा किडे गोड पदार्थांकडे आकर्षित होतात. जर तिखट मिठाच्या पदार्थांनाही मुंग्या लागत असतील तर समजा कि वाईट काळ येणार आहे.
5) काच किंवा चीनी मातीची भांडी शुभ मानली जातात. जर ही भांडी तडकत असतील तर समजून जा कि संकट वाटेवर आहे.जर घरात एखादी काचेची वस्तू किंवा भांडे फुटले याचाच अर्थ असा कि काही वाईट गोष्ट घडणार आहे 6) अनेकदा असे होते कि जेवताना तुमचा पहिला घास तुम्हाला कडु लागतो आणि नंतर घेतलेला दुसरा घास मात्र तुम्हाला योग्य वाटतो. जर असे काही घडले असे तर समजून जा कि तुमचा वाईट काळ जवळ आला आहे आणि तुमच्या नात्यात दुरावा येणार आहे.