या तीन चुका तुमच्या शरीराचे करतात नुकसान !

आपण सगळे दिवसभर बरीच कामे करतो. काही कामे अशी असतात जी लोक रोज करतात आणि मग ती त्यांची सवय बनते. पण तुम्हाला याची कल्पना आहे का कि दिवसभरात तुम्ही अशी कोणती कामे करता ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो? आज आम्ही तुम्हाला अशा तीन कामांबद्दल सांगणार आहोत जी सगळे सवयीने करतात पण त्याचा त्यांच्या शरीरावर वाईट परीणाम होतो. तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या दैनंदिन जीवनातील गोष्टी.

१. बाथरूम वापरल्यानंतर हात न धुणे

सगळेच लोक हे म्हणतात कि आपण आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. असे खूप कमी लोक असतात जे बाथरूमला जाऊन आल्यानंतर आपले हात धुतात. ही एक वाईट सवय आहे. बाथरुमला जाताना आपले हात बर्याच ठिकाणी लागतात, ज्यामुळे आपल्या हाताला बैक्टीरिया चिकटतात आणि ते जेवताना आपल्या तोंडात जातात ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.यासाठीच बाथरुमला जाऊन आल्यावर नेहमीच हात साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करा.

२. नखे चावणे

असे अनेक लोक असतात ज्यांना नखे खाण्याची सवय असते. पण असे करणे चुकीचे आहे कारण आपले हात दिवसभर कुठे कुठे लागत राहतात आणि हाताला किटाणू चिकटतात आणि नखे चावल्याने ते किटाणू तोंडावाटे पोटात जातात. हे किटाणू अनेक आजारांचे कारण बनते. नखे वेळच्या वेळी कापा . नखे वाढवायची आवड असल्यास ती वेळोवेळी स्वच्छ करत जा.

३. काडेपेटीतल्या काडीने कान साफ करणे

अनेक जणांना काडेपेटीतील काडीने कान साफ करण्याची वाईट सवय असते. आपल्या कानातला आतील भाग हा खूप नाजूक आणि संवेदनशील असतो. म्हणूनच त्याला कडी लागल्याने त्या भागाचे मोठे नुकसान होऊ शकते. कडी कानाच्या पडद्याला लागून कानाचा पडदा कधीतरी फाटू शकतो किंवा कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचू शकते. जर काडी खूप खोल गेली तर कानातून रक्त येऊ शकते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या कानांची सफाई करायची असेल तर तुमच्या मनाने करू नका, त्यासाठी डॉक्टरांकडे जा.

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही सांगा. तुमच्या मित्रांबरोबर शेयर करा . आम्ही अशाच आरोग्यासंबंधित आणखी काही पोस्ट तुमच्यापर्यंत आणत जाऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *