लहान सहान गोष्टीमुळे रडणारे असतात खास, तुम्हाला पण येते वारंवार रडू, तर तुमच्याकडे आहेत या खास गोष्टी.

भावना सगळ्यांनाच असतात. जेव्हा एखादा माणूस कोणत्याही गोष्टीमुळे खुश होतो तेव्हा तो हसतो आणि दुख्ख झाल्यावर रडतो. काहीवेळा लोकांना जास्त आनंदाने आनंदाश्रू येतात. प्रत्येक गोष्टीत रडणाऱ्याना कमजोर हृदयाचे समजले जाते. लोकांना वाटते कि जे लहान गोष्टीत रडतात ते आतून खूप कमजोर असतात पण हे खरे नाही. असे लोक कमजोर नसतात उलट एका रिपोर्टनुसार हे लोक इतरांच्या तुलनेत खूप खास असतात. आज आपण बोलूया काय खास गोष्ट असते अशा लोकांची आणि हे लोक कशात कुशल असतात.चला पाहूया

प्रत्येक गोष्टीत रडणाऱ्या व्यक्तीला कधीही दुर्बल समजू नका. असे लोक कमजोर नाही तर आतून खूप मजबूत असतात. कोणत्याही प्रॉब्लेममध्ये हे स्वतःला चांगल्याप्रकारे हाताळू शकतात. रडण्याचा अर्थ असा नाही कि ते कमजोर आहेत उलट रडण्याने ते स्वतःला अधिक चांगले आणि मजबूत समजतात. असे म्हणतात कि रडण्याने तणाव दूर पळतो. तणाव आल्यावर माणसाला मोकळेपणाने रडण्यास सांगितले जाते कारण तणावावर रडणे हे चांगले औषध आहे. यामुळे ताजेतवाने वाटते आणि तुम्हाला असे कळेल कि तुमचे सगळे दुख्ख आणि त्रास अश्रूबरोबर वाहून गेले आहे.

हळवी व्यक्ती एक चांगली मित्र होऊ शकते. काही लोक समोरच्याचा त्रास समजून न घेताच त्याला सल्ला देतात. पण एक हळवी व्यक्ती दुसर्याच्या त्रास नीटपणे समजून घेऊन त्याच्या भावनांचा आदर करते. ते देखावा करत नाहीत. आजच्या पर्वात इमोशनल इंटेलिजेंस किंवा इमोशनल कोशेंटकडे लोक दुसर्या नजरेने पाहतात. जसे कि जर कोणी व्यक्ती दुख्खात असेल आणि रडत असेल तर त्याची साथ द्यायला समोरची व्यक्तीही रडू लागते ज्याला एक चांगली प्रतिक्रिया मानली जाते. प्रत्येक गोष्टीत रडणारे किंवा हळवे लोक चांगल्या मनाचे असतात. त्यांच्या मनात कोणासाठीच कोणत्याही प्रकारच्या वाईट भावना नसतात. हे कोणाबद्दल वाईट बोलत नाहीत. अशी व्यक्ती सगळ्यांबद्दल चांगलाच विचार करते.

पण अनेकदा अशा लोकांना त्रासाला सामोरे जावे लागते. कधी कधी अशा लोकांबद्दल गैरसमजही करून घेतले जातात. असे त्यांना स्वतःलाही वाटते म्हणून ते लगेच रडू लागतात. अशात तज्ञांचा सल्ला घ्यावा म्हणजे पुढे कोणताही त्रास होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *