वडिलांनी मुलीच्या लग्नपत्रिकेवर असे काही लिहिले जे वाचून सगळे झाले थक्क !

खरे तर लग्नाची पत्रिका ही खूप खाजगी बाब आहे आणि यात लोक नवरा नवरी यांच्या परिचयाबरोबरच व्यक्तिगत माहितीही सदर करतात. हल्लीच उत्तर प्रदेशात अशी एक लग्नपत्रिका छापली गेली आहे ज्यात असे काही लिहिले गेले आहे कि जो हल्ली चर्चेचा विषय बनला आहे. खरे तर या पत्रिकेत लग्नाशी संबंधित माहितीच्या बरोबरीनेच एक सामाजिक संदेशही लिहिला गेला आहे आणि म्हणूनच ही पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. चला पाहूया असे काय लिहिले गेले आहे या पत्रिकेत.

तसेही आजकाल लग्नात काहीतरी वेगळे करण्याचा प्रघात पडला आहे. लोक डेस्टिनेशन वेडिंग पासून ते लग्नाचा ड्रेस किंवा इतर गोष्टींबाबत नवनवीन प्रयोग करत आहेत अन उत्तर प्रदेशात लग्नपत्रिकेत असे काही केले गेले आहे कि जे समाजासाठी एक आदर्श ठरले. वास्तविक उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेत एक सामाजिक संदेशही लिहिला आहे. कन्नौजच्या तालग्रामच्या या शेतकरी वडिलांनी मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत असे लिहिले आहे कि दारू पिण्याला मनाई आहे. या अशा चांगल्या संदेशाची सगळीकडेच तारीफ होते आहे. एक वडील असण्याच्या कर्तव्याच्या बरोबरीनेच त्यांनी आपले सामाजिक कर्तव्यही निभावले आहे. या मुळेच ते सगळीकडे चर्चेचा व प्रशंसेचा विषय ठरले आहेत.

कन्नौजच्या तालग्रामच्या अवधेश चंद्र यांचे असे म्हणणे आहे कि त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नपत्रिकेवर असा संदेश लिहिला आहे कारण नेहमीच लोक नशा करतात व लग्नासारख्या कार्यक्रमात त्यांना भान राहात नाही व ते कार्यक्रमाचा विचका करतात. आणि म्हणूनच लोकांना दारू पिण्याची मनाई केली गेली आहे. या उत्तम कार्यासाठीच त्याचे कौतुक सगळीकडे होत आहे. असे म्हणातात कि हे असेच जर इतर लोकांनीही केले तर नशा करण्यावर अंकुश राहू शकेल. जेव्हा लोक स्वतःच लग्नाकार्यात दारू व इतर नशा करणाऱ्या गोष्टींचा बंदोबस्त करतात.अनेक लग्नसमारंभात कॉकटेलपार्टीचे आयोजन केले जाते. याने दारू पिण्याला बढावा दिला जातो. अशातच अवधेश चंद्र यांनी लग्नपत्रिकेवर अशी सूचना लिहून एक वेगळेच पाउल उचलले आहे. अनेक लोकांना ही संकल्पना आवडली असून याचे कौतुक सगळीकडे केले जात आहे. याप्रमाणेच इतर लोकांनीही जर का केले तर तो योग्य निर्णय ठरेल व दारू पिण्यावर निश्चितपणे नियंत्रणही येउ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *